शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइलवरून दिली ३ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा

By admin | Updated: April 6, 2017 02:12 IST

महाविद्यालयात परीक्षा होती, पण उत्तरपत्रिका वाटण्यात आल्या नाहीत

मुंबई : महाविद्यालयात परीक्षा होती, पण उत्तरपत्रिका वाटण्यात आल्या नाहीत आणि मोबाइल बाहेर ठेवण्यासदेखील सांगण्यात आले नाही. कारण मोबाइलवरूनच विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि लगेच निकालही त्यांच्या मोबाइलवर त्यांना मिळाला. विद्याविहारच्या के. जे. सोमय्या महाविद्यालयात तब्बल तीन हजार विद्यार्थ्यांनी २५ गुणांची परीक्षा मोबाइलवरून दिली. ‘क्लिकर (क्लासरूम रिस्पॉन्स सीस्टिम) व्होटिंग मशिन डिवाइस’च्या सहाय्याने केलेला हा देशातील पहिला प्रयोग असून, तो यशस्वी झाल्याचे महाविद्यालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. त्यामुळे दैनंदिन आयुष्यात नवनवीन यंत्रांचा वापर वाढला आहे. संशोधनामुळे गेल्या काही वर्षांत अनेक गोष्टींमध्ये बदल झाले आहेत. शैक्षणिक संस्थाही आता हायटेक होत आहेत. के. जे. सोमय्या कला, वाणिज्य महाविद्यालयात तर आता परीक्षांसाठी मोबाइलचा वापर केला आहे. या तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचाही वेळ वाचतो. त्याचबरोबरीने पेपरसाठी होणारा खर्चही कमी झाला आहे. अनेकदा विद्यार्थ्यांना परीक्षा दिल्यानंतर निकालाची बराच काळ वाट पाहावी लागते, पण आता असे होणार नाही. विद्यार्थ्यांनी दिलेले उत्तर त्यांना समजते आणि तत्काळ गुणही मिळतात. त्यामुळे पुनर्मूल्यांकनाचा प्रश्नही उद्भवत नाही. सोमय्या महाविद्यालयाचे प्रो-होस्ट डॉ. राजन वेळुकर यांनी या तंत्रज्ञानाविषयी सांगितले, आॅफी क्लिकर तंत्रज्ञान नवीन असून, देशात पहिल्यांदाच याचा वापर करण्यात आला आहे. महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्याने हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. महाविद्यालयात सुरू करण्यात आलेल्या तंत्रज्ञानामुळे विद्यार्थी आणि शिक्षक दोघांनाही फायदा होणार आहे. परीक्षेसह नियमित अभ्यासक्रम शिकवण्यासाठीही या तंत्रज्ञानाचा वापर पुढच्या काळात करण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांचा शिक्षणाच्या दृष्टीने कल समजणार आहे. त्याचबरोबरीने एखाद्या विषयाचे आकलन झाले आहे की नाही, हे शिक्षकांना तत्काळ समजणार आहे. (प्रतिनिधी)काय आहे आॅफी? : मोबाइलद्वारे परीक्षेसाठी देण्यासाठी आॅफी तंत्रज्ञान के. जे. सोमय्याचा माजी विद्यार्थी अमित शहा याने विकसित केले आहे. ‘आॅफी क्लिकर’साठी (क्लासरूम रिस्पॉन्स सीस्टम) विद्यार्थ्यांना इंटरनेटची आवश्यकता नाही. आॅफी हे मोबाइलसारखे दिसणारे डिवाइस आहे. हे डिवाइस मोबाइलला कनेक्ट करायचे. १२०० ते १५०० वर्गफुटाच्या क्षेत्रफळातील किंवा १२० विद्यार्थी संख्या असलेले वर्ग या तंत्रज्ञानाच्या मदतीने कनेक्ट केले जाते. आॅफी डिवाइसमध्ये असेलेले कंटेंट विद्यार्थी डाउनलोड करू शकतात. यासाठी इंटरनेट किंवा कोणतेही शुल्क लागणार नाही. या डिवाइसमध्ये तीन टीबीपेक्षा जास्त कंटेंट साठवता येणार आहे. विद्यार्थी मोबाइवरून व्होटिंग मशिनप्रमाणे उत्तरे देऊ शकतात़