शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
3
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
4
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
5
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
6
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
7
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
8
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
9
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
10
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
11
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

288 जागा लढविणो आव्हानच

By admin | Updated: October 4, 2014 02:18 IST

एकत्रित लढण्याचा निर्णय दुर्दैवाने वास्तवात उतरला नाही. 125 ते 13क् जागांची आमची अपेक्षा होती. त्याऐवजी 285 जागा लढवण्याची वेळ आली.

पुणो :  एकत्रित लढण्याचा निर्णय दुर्दैवाने वास्तवात उतरला नाही. 125 ते 13क् जागांची आमची अपेक्षा होती. त्याऐवजी 285 जागा लढवण्याची वेळ आली. त्यामुळे यंत्रणा उभी करावी लागली. परिणामी प्रचाराला मर्यादा आल्या, अशी कबुली राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. 1999नंतर राष्ट्रवादी पहिल्यांदाच एकटय़ाने निवडणुकांना सामोरा जात आहे. ही आव्हानात्मक परिस्थिती आहे. मात्र सर्वच राजकीय पक्षांना जनतेसमोर जाण्याची संधी मिळाली आहे, असेही पवार म्हणाले.  
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, आघाडी व्हावी अशीच माझी भूमिका होती. दीड - दोन महिन्यांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी मी भेट घेतली तेव्हा त्या आघाडीविषयी सकारात्मक होत्या. राहुल गांधी यांचा याविषयीचा निर्णय काय होता हे माहिती नाही. पण तेव्हा दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या दोन ते तीन बैठका झाल्या. जागावाटपाचा प्रश्न असल्याने दोन्ही काँग्रेसच्या आघाडीचा विषय राज्यपातळीवर चर्चेला आला. त्या वेळी राष्ट्रवादीने 144 जागांची तसेच काही काळासाठी मुख्यमंत्रिपदाची मागणी केली. चर्चा सुरू असतानाच काँग्रेसने उमेदवारांची यादीही जाहीर केली. त्यात आमच्या वाटय़ाला सोडलेल्या काही जागांचाही समावेश होता. त्यामुळे आघाडी होण्यास अडचणी निर्माण झाल्या, असे ते म्हणाले.
संभाव्य मोदीलाटेबाबत ते म्हणाले, काँग्रेसने राहुल गांधी यांना तर भाजपाने नरेंद्र मोदी यांना प्रोजेक्ट केले होते. देशभर हे दोघेही फिरत होते. जनतेने मोदींच्या बाजूने कौल दिला. 
मात्र महाराष्ट्राचे प्रशासन चालवण्यासाठी मोदी येणार नाहीत. उत्तर प्रदेशमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये 9पैकी 8 जागांवर भाजपाचा पराभव झाला हा बोलका ट्रेंड आहे. शेतमालाच्या किंमती कमी झाल्याने, निर्यातबंदी लागू झाल्याने तेथील शेतक:यांनी भाजपाच्या विरोधात निकाल दिला आहे.
 
दक्षिण कराडमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात उमेदवार उभा केला जावा, असे मला वाटत होते. परंतु, त्यांच्याविरोधात रिंगणात उतरलेल्या विलासकाका उंडाळकर यांना राष्ट्रवादीने पाठिंबा देण्याचा निर्णय स्थानिक नेतृत्वानेच घेतला असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. माङयाच उमेदवारांच्या प्रचारासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ नाही. त्यामुळे उंडाळकर यांच्या प्रचारासाठी मात्र आपण जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
स्वबळावर सत्ता आणणार : अर्जुनाचे लक्ष जसे माशाच्या डोळ्यावर होते तसा मी फक्त स्वबळावर सत्ता आणण्याचाच विचार करतोय. निवडणुकीनंतर आघाडय़ांबाबतचा विचारही माङया डोक्यात सध्या नाही. एकाच पक्षाला बहुमत मिळावे ही माझी इच्छा आहे. लोक आमच्यापेक्षा शहाणो असतात. ते योग्य निर्णय घेतील. निवडणुकीनंतर आम्ही भाजपा किंवा शिवसेनेबरोबर जातोय असा आरोप करणा:या कॉँग्रेस नेत्यांचा सामाजिक आवाका आणि महाराष्ट्राबद्दलचे ज्ञान कमी दिसतेय, अशी टीका पवार यांनी केली.