शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या भरपाईसाठी २७०.१४ कोटींचा निधी

By admin | Updated: October 19, 2016 03:39 IST

अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे अनेक ठिकाणी घरांची पडझड व मालमत्तेचे नुकसान होऊन वित्तहानी झाली होती.

हितेन नाईक,

पालघर- पालघर जिल्ह्यासह अन्य चार जिल्ह्यात फेब्रुवारी व मार्च २०१५ मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे अनेक ठिकाणी घरांची पडझड व मालमत्तेचे नुकसान होऊन वित्तहानी झाली होती. तसेच भातिपकांचे विशेषत: बागायती शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते. अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून ४२४८.८९ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून त्यापैकी २७०.१४ कोटींचा निधी पालघर जिल्ह्यासाठी राज्य शासनाने उपलब्ध करून दिला आहे. या वेळी मच्छीमारांच्या तोंडाला मात्र शासनाने पाने पुसल्याने मच्छीमारा मध्ये नाराजी पसरली आहे.जिल्ह्यात आंबा, काजू, चिकू यांसह अन्य शेती उत्पादनांचं नुकसान लक्षणीय होतं. या गारपीटीमध्ये नुकसान झालेल्या राज्यभरातील शेतकरी व अन्य आपदग्रस्तांना विशेष बाब म्हणून शासनाने नुकसान भरपाई जाहीर केली असून पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या विशेष प्रयत्नांतून पालघर जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांसाठी २७०.१४ कोटींचा विशेष निधी उपलब्ध करण्यात आला आहे.फेब्रुवारी व मार्च २०१५ मध्ये झालेला अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे राज्यातील रत्नागिरी जिल्ह्याला ३६२४.५१ कोटी पालघर जिल्ह्याला २७०.१४, नागपूर जिल्ह्याला ३२८.७८, भंडारा जिल्ह्याला २५.११ व चंद्रपूर जिल्ह्याला ०.३५ लाख असा एकूण ४२४८.८९ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या जिल्हयात शेती उत्पादनांचे मोठे नुकसान झाले होते तर काही ठिकाणी जिवीतहानी-वित्तहानीही झाली होती. कोकणातील रत्नागिरी व पालघर जिल्ह्यातील आंबा, चिकू व अन्य बागायती फळ पिकांचं मोठ्याप्रमाणात नुकसान झालं होतं.