शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्तीपासून २५ हजार विद्यार्थी वंचित!

By admin | Updated: September 5, 2016 04:38 IST

वार्षिक शैक्षणिक खर्चासह किरकोळ खर्च भागवण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांना २०१०-११ पासून सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्ती योजना लागू

ठाणे : वार्षिक शैक्षणिक खर्चासह किरकोळ खर्च भागवण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांना २०१०-११ पासून सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्ती योजना लागू झाली; पण ठाणे जिल्ह्यातील सुमारे २५ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी मागील दीड वर्षापासून या शिष्यवृत्तीपासून वंचित असल्याचे श्रमिक मुक्ती संघटनेच्या अहवालावरून उघड झाले आहे.पहिली ते दहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती लागू करण्यात आलेली आहे. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक हजार रुपये, तर पाचवी ते सातवीसाठी एक हजार ५०० रुपये आणि आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना दोन हजार रुपये शिष्यवृत्ती मंजूर झालेली आहे. मात्र, मागील सुमारे दीड वर्षापासून २५ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी या शिष्यवृत्तीपासून वंचित असल्याचे उघड झाले आहे.जिल्ह्यातील एकाही विद्यार्थ्यास या शिष्यवृत्तीचा लाभ मिळालेला नाही. यामध्ये मुरबाड तालुक्यात पाच हजार ६३० विद्यार्थ्यांसह शहापूर तालुक्यात नऊ हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नसल्याचे सर्वेक्षणाअंती उघड झाल्याचे श्रमिक मुक्ती संघटनेच्या कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. इंदवी तुळपुळे यांनी सांगितले. कल्याण, अंबरनाथ, भिवंडी या तालुक्यांतील विद्यार्थ्यांचेदेखील लवकरच सर्वेक्षण केले जाणार आहे. दररोज नवीननवीन आश्वासने, योजना जाहीर करत आदिवासींचा पुळका असल्याचे सरकार जाहिरातींद्वारे करीत असल्याचा आरोपही तुळपुळे यांनी केला असून आदिवासी विकास विभागाच्या सचिवांना लेखी निवेदन देऊन आदिवासींच्या विविध योजनांकडे त्यांचे लक्ष वेधले आहे. आरोग्य, पोषण, शिक्षण याबाबतच्या सर्व योजना अंमलबजावणीअभावी कागदावर शोभेच्या बनून राहिल्या आहेत, असा खेद व्यक्त करून याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची अपेक्षा सचिवांकडून केली आहे. (प्रतिनिधी)