शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगांसाठी २५ टक्के पाणी कपात अद्याप कायम

By admin | Updated: July 15, 2016 18:17 IST

तापी औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना अद्याप हायकोर्टाच्या आदेशानुसार २५ टक्के पाणी कपात सुरू आहे.

ऑनलाइन लोकमत

धुळे, दि. 15 - तापी औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना अद्याप हायकोर्टाच्या आदेशानुसार २५ टक्के पाणी कपात सुरू आहे. या संदर्भात पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत स्थिती ‘जैसे थे’च राहील, अशी माहिती सूत्रांनी दिली. मे महिन्यात पाण्याची तीव्र टंचाई भासत असल्याने मद्यनिर्मिती करणाऱ्या उद्योगांना पाणी कपातीसंदर्भात कोर्टाकडे दाद मागण्यात आली होती. तेव्हा कोर्टाने उद्योगांना दोन टप्प्यांत अनुक्रमे २० व २५ टक्के कपात करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार येथील एमआयडीसी क्षेत्रातील उद्योगांना २७ एप्रिलपासून २० टक्के तर १० मे पासून २५ टक्के पाणी कपातीचा निर्णय अंमलात आणण्यात आला होता. मद्यनिर्मिती उद्योगांना यापेक्षा अधिक प्रमाणात कपातीचे निर्देश असल्याचे सूत्र म्हणाले. येथील औद्योगिक क्षेत्रात लहान-मोठे सुमारे ५५० उद्योग आहेत. या सर्वांना १० मे पासून २५ टक्के कपात करून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या संदर्भात उद्योगांकडून कोणतीही खळखळ व्यक्त न करता या आदेशाची अंमलबजावणी करण्याची हमी देण्यात आली होती. तसेच या पाणी कपातीमुळे कोणत्याही उद्योगाच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. उद्योगांना सध्या सुरू असलेल्या २५ टक्के पाणी कपातीसंदर्भात मुख्य कार्यालयाकडून अद्याप कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाही. एमआयडीसीच्या स्वमालकीच्या तलावात गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे २८ दलघफू (एफसीएमटी) पाणी साठा झालेला आहे. तलावाची क्षमता ६५ दलघफू एवढी आहे. त्यामुळे तलावात हल्ली ४५ टक्के साठा उपलब्ध आहे. परंतु अद्याप कोणतेही आदेश न मिळाल्याने उद्योगांना २५ टक्के कपातीनुसार पाणीपुरवठा केला जात आहे.