शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

करमणूक कर थकबाकी २५ कोटींवर

By admin | Updated: July 8, 2014 01:18 IST

करमणूक कर कोणी भरावा या मुद्यावरून एमएसओ (मल्टी सिस्टीम आॅपरेटर)आणि स्थानिक केबल आॅपरेटर यांच्यातील वादाचा फटका जिल्हा प्रशासनाला बसला असून संबंधितांनी जिल्हा प्रशासनाकडे कर

ग्राहकांकडून वसूल: सरकारला देण्यास नानागपूर: करमणूक कर कोणी भरावा या मुद्यावरून एमएसओ (मल्टी सिस्टीम आॅपरेटर)आणि स्थानिक केबल आॅपरेटर यांच्यातील वादाचा फटका जिल्हा प्रशासनाला बसला असून संबंधितांनी जिल्हा प्रशासनाकडे कर भरणेच बंद केल्याने थकबाकी २५ कोटींवर गेली आहे.केबल ग्राहकांकडून ४५ रुपये प्रति महिना करमणूक कराची आकारणी स्थानिक केबल आॅपरेटर करतो. गेल्या अनेक महिन्यांपासून ही वसुली नियमित सुरू असताना प्रत्यक्षात हा कर सरकारजमा केला जात नाही. स्थानिक केबल आॅपरेटरने हा कर जमा करावा की एमएसओंनी जमा करावा या मुद्यावर वाद आहे. मार्च २०१४ मध्ये राज्य शासनाने यासंदर्भात जी.आर. काढून एमएसओंवर ही जबाबदारी टाकली आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कर भरण्याचे प्रमाण फारच अत्यल्प आहे. सध्या ही रक्कम २५ कोटींवर गेली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.नागपूरमध्ये स्थानिक केबल आयोजकांची संख्या ६७० आहे. मे २०१४ अखेरपर्यंत केबल जोडण्यांची संख्या ४ लाख ९९ हजार होती. मे २०१४ अखेरपर्यंत त्यांच्याकडून फक्त ५.२६ लाख रुपयेच वसुल होऊ शकले. कराचा दर आणि केबल जोडणीधारकांची संख्या लक्षात घेता दर महिन्याला करमणूक करापोटी सव्वा दोन कोटी रुपये जमा व्हायला हवेत. हे येथे उल्लेखनीय.करमणूक कर वसुलीसाठी जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी प्रयत्न केले. सर्व संबंधितांना नोटीस पाठविल्या. त्यांच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दाखल केली. काही केबल आॅपरेटर्सवर कारवाईसुद्धा झाली. मात्र तरीही तोडगा निघाला नाही. वाढती थकबाकी लक्षात घेऊन अलीकडेच अतिरिक्त जिल्हाधिकारी पंजाबराव वानखेडे यांनी एमएसओंजी बैठक घेतली.यात कर वसुलीबाबत चर्चा करण्यात आली. कर कोणी भरावा हा मुद्दा पुन्हा या बैठकीत चर्चेला आला. शासनाच्या नियमाप्रमाणे करवसुली करून ती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा करावी, असी सूचना यावेळी एमएसओंना देण्यात आली. यासाठी काही मुदत देण्यात आली आहे. त्यानंतरही कर जमा झाला नाही तर प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. (प्रतिनिधी)