शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आठवड्यात २४ हजार अर्ज कन्फर्म

By admin | Updated: June 9, 2016 06:10 IST

राज्यातील अभियांत्रिकी पदवी प्रवेश प्रक्रियेसाठीच्या १ लाख ३८ हजार ७४१ जागांसाठी आॅनलाईन अर्ज भरण्यास २ जूनपासून सुरूवात झाली

मुंबई : राज्यातील अभियांत्रिकी पदवी प्रवेश प्रक्रियेसाठीच्या १ लाख ३८ हजार ७४१ जागांसाठी आॅनलाईन अर्ज भरण्यास २ जूनपासून सुरूवात झाली आहे. अवघ्या आठवड्याभरात २४ हजार ४१९ विद्यार्थ्यांनी अर्ज कन्फर्म केले आहेत. त्यातील ५० टक्क्यांहून अधिक अर्ज मुंबई आणि पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी केले आहेत.गेल्यावर्षी उपलब्ध असलेल्या १ लाख ५३ हजार ८६७ जागांत यंदा १५ हजार १२६ जागा कमी झाल्या आहेत. त्यामुळे यंदा उपलब्ध असलेल्या १ लाख ३८ हजार ७४१ जागांसाठी विद्यार्थ्यांमध्ये चांगलीच चुरस असेल. बुधवारपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांनी अपूर्ण भरलेले, पूर्ण भरलेले आणि कन्फर्म केलेल्या अर्जांची संख्या सुमारे ८७ हजार ०९८ इतकी आहे. त्यात अपूर्ण भरलेले अर्ज १६ हजार ३५७, पूर्ण भरलेले मात्र कन्फर्म न केलेल्या अर्जांची संख्या ४६ हजार ३२२ आणि कन्फर्म अर्जांची संख्या २४ हजार ४१९ इतकी आहे. त्यामुळे अवघ्या आठवड्याभरात मिळालेला प्रतिसाद पाहता एकूण दोन लाख अर्ज येण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.अभियांत्रिकी पदवीच्या आॅनलाईन प्रवेशासाठी राज्यातील एकूण १० विद्यापीठांसह इतर विद्यापीठे आणि स्वायत्ता संस्था आणि राज्य शासन मान्यता असलेल्या स्वायत्त संस्थांमधील विद्यार्थ्यांना अर्ज करता येतात. मात्र स्वायत्ता संस्था आणि राज्य शासन मान्यता असलेल्या स्वायत्त संस्थांमधील एकही विद्यार्थ्याने यावेळी अर्ज केलेला नाही. (प्रतिनिधी)अभियांत्रिकी पदवीचे संभाव्य वेळापत्रक२ जून ते १६ जूनदरम्यान आॅनलाइन अर्ज भरता येतील.२ जून ते १७ जूनदरम्यान कागदपत्रांची तपासणी आणि सुधारणा करता येईल.दरम्यान सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुविधा केंद्रावर जाऊन विद्यार्थ्यांना अर्ज निश्चिती करता येईल.१९ जूनपर्यंत संभाव्य गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल.१९ जून ते २१ जूनदरम्यान सायंकाळी ५ वाजेपर्यंत यादीवर असलेल्या हरकती सुविधा केंद्रावर जाऊन मांडता येतील.२२ जूनपर्यंत सर्व विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल.