शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या २४ बंडखोरांची हकालपट्टी

By admin | Updated: February 17, 2017 20:31 IST

महापालिका निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी करणाऱ्या २४ पदाधिकाऱ्यांची भारतीय जनता

ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि.17 : महापालिका निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी करणाऱ्या २४ पदाधिकाऱ्यांची भारतीय जनता पक्षाने सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. भाजपाचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी या संदर्भातील निर्णय जाहीर केला आहे. भाजपाच्या बंडखोरांनी १९ प्रभागात पक्षाच्या उमेदवारांविरुद्ध निवडणूक रिंगणात आपली उमेदवारी कायम ठेवली आहे त्यामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना धोका निर्माण झालेला असताना पक्षाकडून या बंडखोरांच्या बाबतीत कोणताच निर्णय होत नसल्याने मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली जात होती. त्यापार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. हकालपट्टी करण्यात आलेल्यांमध्ये प्रामुख्याने जवळपास सर्वच मूळ भाजपाचेच सक्रिय कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत. अनेक वर्षे पक्षात काम केल्यावरही महापालिका निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली नाही, उलट ऐनवेळी पक्षात आलेल्यांना मानाचे पान देण्यात आल्याची खंत व्यक्त करीत त्यांनी बंडखोरी केली होती. अर्थातच पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने संतापलेल्या बंडखोरांनी पक्ष नेत्यांवर आर्थिक देव-घेवीचे आरोप केले त्याचबरोबर पक्षाने अन्याय केल्याची भावनाही व्यक्त केली होती. या साऱ्या पार्श्वभूमीवर बंडखोरांची कृती पक्ष विरोधी कारवाया ठरविण्यात येऊन त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई म्हणून सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करून त्यांचे पक्ष सदस्यत्व रद्द करण्यात येत असल्याचे सानप यांनी पत्रकात म्हटले आहे. निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये विद्यमान नगरसेवक, शहर सरचिटणीस, शहर चिटणीस, महिला आघाडीच्या उपाध्यक्ष, व्यापारी आघाडीचे उत्तर महाराष्ट्रप्रमुख, आदिवासी आघाडीचे शहराध्यक्षांचा समावेश आहे. हकालपट्टी झालेले बंडखोरश्रीमती मंदाबाई बबन ढिकले (प्रभाग १८), सुरेश अण्णाजी पाटील (१२), प्रकाश दीक्षित (१२), दीपाली मिलिंद भूमकर (१३), मिलिंद भूमकर (१३), डॉ. वैशाली काळे (१४), मधुकर हिंगमिरे (७), संदीप मंडलेचा, सोनल मंडलेचा (२९), जयश्री पद्माकर घोडके, चारुहास पद्माकर घोडके, लता संजय करिपुरे, संजय करिपुरे (२३), समीर पद्माकर गायधनी (१३), रुक्मिणी धोंडीराम कर्डक (४), दीपक शेवाळे, विनायक बाळासाहेब बर्वे (९), श्रीमती अलका रामचंद्र गांगुर्डे (१४), सविता गायकवाड (१६), मीरा गोसावी (१७), विकास पगारे (२०), सरला महेंद्र अहिरे (२१), राजेंद्र मंडलिक (२२) यांचा समावेश आहे.