शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णसेवेसाठी आॅनड्युटी २४ तास

By admin | Updated: October 20, 2016 01:44 IST

वॉर्डरूममध्ये रुग्णांची सेवा देण्यासाठी धावपळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले़ रुग्णांना एका ठिकाणाहून दुसऱ्या विभागात हलविणे

पिंपरी : वेळ रात्री साडेदहाची वायसीएम रुग्णालयातील परिचारिकांची विविध वॉर्डरूममध्ये रुग्णांची सेवा देण्यासाठी धावपळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले़ रुग्णांना एका ठिकाणाहून दुसऱ्या विभागात हलविणे, त्यांची सलाईन बदलणे, डॉक्टरांकडून त्यांना मध्यरात्रीच्या सुमारास कोणती औषधे द्यायची, याबाबत सल्लामसलत करणे, तसेच रुग्णांशी गप्पा मारीत भावनिक नाते जपण्याचा प्रयत्न केला जात होता़ अनेक दिवसांपासून आजारपणावर उपचार घेणारे रुग्ण, तर काही घरातील कुटुंबाप्रमाणे परिचारिकांना हक्काने आवश्यक गोष्टींची मागणी करताना आढळून आले़ अनेक रुग्णालयात रुग्णाला आजारपणातून बरा करण्यासाठी डॉक्टरांची जेवढी मेहनत असते, तेवढीच मेहनत रुग्णालयातील परिचारिका करीत असतात़ आजारपण आल्यानंतर रुग्णाची कुटुंब काळजी घेतेच, मात्र कुटुंबापेक्षाही रुग्णांची काळजी घेण्यासाठी शहरातील अनेक रुग्णालयांतील परिचारिका रात्रपाळीचे काम करीत असताना शुश्रूषा करीत असल्याचे दिसून येते़ सरकारी रुग्णालयासह अनेक खासगी रुग्णालयातील परिचारिकांचे काम साधारण रात्री आठ वाजल्यापासून सुरू होते़ शहरातील वायसीएम, सांगवी, भोसरी, थेरगाव, आकुर्डी, यमुनानगर, जिजामाता रुग्णालयातील परिचारिकांचा रात्रीचा दिवस सुरू होतो, तो रुग्णांची सेवा करताना़ साधारण रात्री साडेआठच्या सुमारास विविध रुग्णालयात परिचारिका ड्युटीवर हजर होतात़ घरातील सर्व कामे आटोपून, कुटुंबाचा स्वयंपाक करून, परिवारातील इतर कामे करून, रुग्णांची सेवा करण्यासाठी त्या वेळेत हजर होतात़ सकाळच्या ड्युटीवर असलेल्या परिचारिकेकडून माहिती घेऊन कोणत्या रुग्णाला काय हवंय, काय नकोय, याची तपासणी करून रात्रपाळीला आलेल्या परिचारिका रुग्णांबद्दल काळजी घेण्याच्या दृष्टीने काम करण्यास सुरुवात करतात़ रात्रीच्या वेळेस दोन-तीन वेळा रुग्णाची स्थिती जाणून घेणे, सलाइन संपल्यांनतर वेळेवर सलाइन लावणे, रुग्णाने मागणी केलेल्या वस्तूंची पूर्तता करणे, वेळेवर इंजेक्शन देणे, अचानक रुग्णाची तब्येत बिघडल्यास प्राथमिक उपचार करून त्वरित डॉक्टरांना माहिती देणे, अशी कामे जनरल वॉर्डमध्ये रात्रपाळीच्या परिचारिका करीत असतात़ बऱ्याच वेळा अनेक रुग्ण बाहेरगावाहून उपचारासाठी दवाखान्यात दाखल झालेले असतात़ अतिदक्षता विभागातील अनेक परिचारकांना सतत दक्ष राहावे लागते़ (प्रतिनिधी)अतिदक्षता वॉर्डमधील तापमान नियंत्रणात ठेवणे, रुग्णांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष देणे, अचानक तब्येत बिघडल्यास डॉक्टरांना माहिती देणे, रात्रपाळीच्या वेळेत अपघात झालेले रुग्ण दाखल झाल्यास त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून डॉक्टरांना बोलाविणे़ अशा विविध कामांमुळे रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील सांधाता म्हणून रात्रपाळीच्या ड्युटीवर असलेल्या हजारो परिचारिका रुग्णांची सेवा करीत असल्याचे दिसून आले आहे़ रात्रपाळीवर काम करीत असताना परिचारिकांवर मोठी जबाबदारी असल्याने रात्रभर जागे राहून रुग्णांची सेवा करीत असतात़ एकंदरीत पैसा कमावण्यासाठी शहरातील अनेक नागरिक विविध मार्गाने काम करीत असतात़ मात्र, रात्रपाळीचे काम करून रुग्णांची सेवा करीत त्यांची जबाबदारी घेण्याची महत्त्वाची कामगिरी परिचारिका करीत आहेत़