शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

पालघरमधील २३ आॅक्टोबरच्या मराठा मोर्चाची जय्यत तयारी

By admin | Updated: October 20, 2016 03:34 IST

पालघर जिल्ह्यात मराठा तरुण, तरुणी, आबालवृद्ध, छोटी मंडळी २३ आॅक्टोबर रोजी पालघर जिल्ह्यातील मराठा मूक मोर्चाच्या तयारीला लागला आहे.

पालघर : आपल्या घरात एखादे शुभकार्य ठरावे आणि त्या कार्यासाठी संपूर्ण कुटुंबाने एकदिलाने जुंपावे, अगदी तशीच काहीसे वातावरण पालघर जिल्ह्यात मराठा तरुण, तरुणी, आबालवृद्ध, छोटी मंडळी २३ आॅक्टोबर रोजी पालघर जिल्ह्यातील मराठा मूक मोर्चाच्या तयारीला लागला आहे. हा मोर्चा न भूतो न भविष्यती असा व्हावा, यासाठी सर्व जण जीव ओतून काम करीत आहेत. या मोर्चामुळे थोडासाही त्रास प्रशासनासह अन्य कुणाला होऊ नये याची विशेष काळजी घेतली जात आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डीतील प्रकरणात पूर्ण न्याय मिळावा आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल व्हावे, ही त्रिसूत्री घेऊन ‘एक मराठा लाख मराठा’ हा मूक मोर्चा संपूर्ण राज्यभर रेकॉर्ड ब्रेक गर्दीने ओसंडून वाहत आहे. अनेक जाती धर्माची जोखडे तोडून या मूक मोर्चात अनेकांनी सहभागी होत आपला पाठिंबा दर्शवित आहेत. २३ आॅक्टोबरला पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठा क्रांती मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून गुजरात राज्यासह, मुंबई आणि पालघर जिल्ह्यातून प्रचंड जनसमुदाय एकत्र येणार आहे. या मोर्चाच्या यशस्वितेसाठी प्रचंड मेहनत घेतली जात असून जिल्हा, तालुका, गाव, विभाग, एवढेच नव्हे तर घराघरात जाऊन माहिती दिली जातं आहे. प्रचंड संख्येने उपस्थित राहणाऱ्यासाठी टी शर्ट, टोप्या, झेंडे, बिल्ले, फलक आदीच्या छपाईची कामे पूर्ण होऊन त्याच्या विक्रीला ही मोठा प्रतिसाद मिळत आहे. संपूर्ण जिल्ह्यात मोठमोठी होर्डिंग, कमानी उभारण्यात आल्या असून कुठेही सर्वसामान्यांना, वाहतुकीला अडथळे निर्माण होणार नाहीत याची विशेष काळजीही घेण्यात येणार आहे. हा मोर्चा बोईसर रस्त्यावरील स.तू. कदम शाळेच्या मैदानात जमूननंतर शिवाजी चौक, चार रस्ता-रेल्वे स्टेशन-हुतात्मा स्तंभ-तहसील कार्यालय समोरून आर्यन शाळेच्या मैदानावर एकत्र येणार आहे. या मार्च्यात सहभागी होण्यासाठी गुजरात राज्यातील वापी, उंबरगाव, तलासरी, या भागातील मोर्चेकरांना मुंबई-अहमदाबाद महामार्गा वरील चिल्हार-बोईसर रस्त्यावरून बोईसर, डहाणू सह एकत्रपणे पालघर मधील स.तू.कदम शाळेजवळील पार्किंगच्या जागेत वाहने ठेवण्यात येणार आहेत. वसई, नालासोपारा, विरार, मनोर, विक्र मगड, जव्हार, मोखाडा, ई. भागातील मोर्चेकऱ्यांसाठी पालघर पूर्वे कढील सेंट जॉन कॉलेज जवळ पार्किंगची व्यवस्था ठेवण्यात आली आहे. हा मूक मोर्चा यशस्वी होण्याच्या दृष्टीने कुठेही गालबोट लागणार नाही असे वागू नये या बाबत स्वयं सेवकांना सूचना देण्यात आल्या आहेत. जनजागृतीसाठी पथनाट्ये, जलद संपर्कासाठी शंभर वॉकीटॉकी घेतलेले स्वयंसेवक, ड्रोन कॅमेरे, वैद्यकीय सेवेसाठी डॉक्टरांची टीम, रेल्वे स्टेशन, तहसील कार्यालयजवळ आणि आर्यन क्र ीडांगणजवळ ठेवण्यात आली आहे. पाणी पिण्याची सुविधा रेल्वे स्टेशन, तहसील कार्यालय आणि आर्यन क्रीडांगणजवळ ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर स्वयंसेवक नंबर, महत्वाचे फोन नंबर, नैसर्गिक विधी व्यवस्था याचीही व्यवस्था ठेवण्यात आली आहे.