शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

सराफाला २३ लाखांचा गंडा

By admin | Updated: July 16, 2017 01:02 IST

एका किरकोळ सोन्या-चांदीचे दागिने विकणाऱ्या व्यापाऱ्याने, ठाण्यातील एका मोठ्या सराफामालकाला सुमारे २३ लाखांचा गंडा घातल्याची घटना घडली.

-लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : एका किरकोळ सोन्या-चांदीचे दागिने विकणाऱ्या व्यापाऱ्याने, ठाण्यातील एका मोठ्या सराफामालकाला सुमारे २३ लाखांचा गंडा घातल्याची घटना घडली. हा प्रकार घडल्यानंतर तब्बल एक महिन्याने या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती ठाणेनगर पोलिसांनी दिली.मुंबईत भायखळा येथे राहणारे मनीष जैन (४५) यांची फसवणूक झाली आहे. त्यांचे ठाणे बाजारपेठेतील कौपिनेश्वर मंदिराजवळ मणिभद्र ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. मूळ उदयपूर, राजस्थान येथील भरत रजपूत (२५) या किरकोळ दागिने विकणाऱ्या व्यापाऱ्याने त्यांचा काही दिवसांतच विश्वास संपादन केला.याचदरम्यान, त्याने जैन यांच्याकडून ९० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या, ३०० ग्रॅम वजनाची सोन्याची ३ बिस्किटे, २५४ ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्किटे, १०० ग्रॅम वजनाची सोन्याची कर्णफुले आणि एक लाख रुपये रोकड, असा २२ लाख ७० हजार ५०० रुपयांचा ऐवज घेऊन त्यांची फसवणूक केली आहे. हा प्रकार १२ मे ते ८ जून २०१७ दरम्यान जैन यांच्या दुकानात घडला. सोने आणि रोकड घेऊन भरत महिना उलटूनही परत येत नसल्याने, जैन यांनी ठाणेनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन, त्याच्याविरोधात तक्रार नोंदविल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक जे. एम. पाटील यांनी दिली. या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.