शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

२२ आमदारांची ‘पाटीलकी’!

By admin | Updated: October 22, 2014 05:49 IST

विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, २२ आमदारांना ‘पाटीलकी’ ठेवण्यात यश आले आहे़

वीरकुमार पाटील, कोल्हापूरविधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, २२ आमदारांना ‘पाटीलकी’ ठेवण्यात यश आले आहे़ गत विधानसभेतील हा आकडा २३ होता़ तर नव्या सभागृहात पाटील, चव्हाण, देशमुख, नाईक या आडनावांच्या आमदारांचे वर्चस्व राहणार आहे. या आडनावांच्या निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या अधिक आहे. यात विधानसभेत ‘पाटीलकी’ करणारे सर्वाधिक २२ आमदार आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसह जवळपास सर्वच निवडणुकांचे गणित हे जातिपातीच्या राजकारणावर अवलंबून राहिले आहे. त्यामुळे अमूक आडनावाचा किंवा जातीचा उमेदवार दिला, तर विशिष्ट जातीची मते मिळतील, असा अंदाज बांधला जातो. बहुतेकवेळा त्यामध्ये यशही येते. त्याशिवाय काही ठराविक आडनावांची लोकसंख्या राज्यात अधिक आहे. ही आडनावे विशिष्ट कामावरून, समाजाने दिलेल्या जबाबदारीवरून, राजेरजवाड्यांच्या काळात मिळालेल्या मानसन्मानावरून पडली आहेत. असे एकाच आडनावाचे उमेदवार अधिक संख्येने निवडून येतात. यंदाही ही परंपरा कायम राहिली असून, पाटील आडनावाचे तब्बल २२ आमदार यंदा विधानसभेत आपआपल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.२००९ मध्ये अस्तित्वात आलेल्या सभागृहात पाटील आडनावाचे २३ आमदार होते. यावेळी त्यामध्ये एकाने घट झाली आहे.चव्हाण, देशमुख आडनावांचे प्रत्येकी आठ आमदार नूतन सभागृहातप्रवेश करणार असून, मावळत्या सभागृहात चव्हाण आडनावाचे पाच, तर चार देशमुख आमदार होते. त्याखालोखाल नाईक आडनावाचे सात आमदार आहेत.त्याशिवाय ठाकूर, शिंदे, कदम या आडनावांचे प्रत्येकी पाच, तर चार जगताप आडनाव असलेले आमदार आहेत.पवार आडनावामध्ये बारामतीतून राष्ट्रवादीचे अजित पवार, कल्याण (पू.)चे भाजपाचे नरेंद्र पवार, गेवराईमधून भाजपाचे लक्ष्मण पवार यांचा समावेश आहे, तर कांबळे आडनावाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तिघांमध्ये देवळीचे काँग्रेसचे रणजित कांबळे, श्रीरामपूरमधील काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे, पुणे कँटोन्मेंटचे दिलीप कांबळे यांचा समावेश आहे.