शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छ’साठी २१ प्रवेशिका

By admin | Updated: August 1, 2016 01:09 IST

महापालिकेने आयोजित केलेल्या स्वच्छ पुरस्कार स्पर्धेच्या प्रवेशिका पाठविण्यासाठीची मुदत आणखी १५ दिवसांनी वाढविण्यात आली आहे.

पुणे : महापालिकेने आयोजित केलेल्या स्वच्छ पुरस्कार स्पर्धेच्या प्रवेशिका पाठविण्यासाठीची मुदत आणखी १५ दिवसांनी वाढविण्यात आली आहे. तर या स्पर्धेसाठी रविवारअखेरपर्यंत (दि. ३१) २१ प्रवेशिका दाखल झाल्या आहेत. महापालिकेने या स्वच्छ पुरस्काराची योजना जाहीर केली़ तिच्या जनजागृतीसाठी गेल्या तीन महिन्यांत मोठ्या प्रमाणावर जाहिरात केली होती़ तब्बल ५ लाख माहितीपत्रकांचे वाटप, रेडिओवरून जाहिराती, पत्रकार परिषदा, व्हॉट्सअप मेसेज, सोसायट्या, संस्थांच्या बैठका अशा विविध माध्यमांतून लाखो रुपये खर्च करून या पुरस्काराची जनजागृती केली होती़ त्यानंतरही शेवटचे तीन दिवस राहिले असताना एकही प्रवेशिका महापालिकेला प्राप्त झाली नव्हती़ लोकमतने याबाबतचे वृत्त २८ जुलै रोजी दिले़ त्यानंतर गेल्या दोन दिवसांत २१ प्रवेशिका मिळाल्या आहेत़ स्वच्छ पुणे, सुंदर पुणे यासाठी पालिकेने वैयक्तिक स्वच्छता आणि सार्वजनिक स्वच्छतेसाठी पुरस्कार योजना जाहीर केली; मात्र तिला प्रतिसादच मिळत नसल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केल्यानंतर दोन दिवसांत २१ प्रवेशिका आल्या आहेत.शहरातील नागरिकांनी घनकचरा व्यवस्थापनात नावीन्यपूर्ण कल्पना तसेच व्यवस्थापनाच्या पद्धतीचा समावेश करावा यासाठी आणि त्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी महापालिकेने या वर्षी स्वच्छ पुरस्कार योजना जाहीर केली आहे. या पुरस्कारात सहभागी होण्यासाठी १ मे ते १ आॅगस्ट २०१६ ची मुदत देण्यात आली आहे. सोमवारी ही मुदत संपत आहे. या कालावधीत विविध घटकांमधून २१ प्रवेशिका स्पर्धेसाठी आल्या असल्याचे सहायक आयुक्त एलिस पोरे यांनी सांगितले. मात्र, अधिकाधिक नागरिकांना या स्पर्धेत सहभागी होता यावे यासाठी या स्पर्धेची मुदत १५ आॅगस्टपर्यंत वाढविण्यात आली असल्याचे पोरे यांनी सांगितले.सर्व घटकांनी स्पर्धेत सहभागी व्हावेकचरा समस्या सोडविण्यासाठी शहरातील विविध घटक विविध उपक्रम राबवीत असतात, पालिकेच्या मोठ्या स्पर्धेत सहभागी कसे व्हायचे, असा प्रश्न त्यांना पडतो. मात्र, कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व छोट्या-मोठ्या संस्था आणि घटकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.