शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

२०१० आणि २०११ चा अहवाल पाठविलाच नाही ; शिष्यवृत्तीचे ६४ लाख रुपये थकीत!

By admin | Updated: July 25, 2016 16:03 IST

शिष्यवृत्ती परीक्षेचा अहवाल वेळेत न पाठविल्याने २६८ विद्यार्थ्यांना देय असलेली ६४ लाख ३२ हजार रुपये रकमेची शिष्यवृत्ती गेल्या ६ वर्षांपासून थकीत आहे

सुनील काकडे,  वाशिमवाशिम : सन २०१० आणि २०११ या दोन वर्षात घेण्यात आलेल्या 'एनएमएमएस' या शिष्यवृत्ती परीक्षेचा अहवाल वेळेत न पाठविल्याने २६८ विद्यार्थ्यांना देय असलेली ६४ लाख ३२ हजार रुपये रकमेची शिष्यवृत्ती गेल्या ६ वर्षांपासून थकीत आहे. दरम्यान, याकामी 'बेपर्वाई' करणारे तत्कालिन शिक्षणाधिकारी विश्वास लबडे यांच्याकडून सदर रक्कम वसूल करावी, अशी शिक्षण संचालकांची सूचना असल्याची माहिती सूत्रांनी सोमवार, २५ जुलै रोजी दिली.

राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली (एनसीईआरटी) मार्फत सन २००७-०८ पासून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) घेतली जाते. यामाध्यमातून आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांचा शोध घेवून त्यांना इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंतच्या शिक्षणासाठी दरमहा ५०० रुपये शिष्यवृत्ती देण्याची तरतूद आहे. त्यानुसार, सन २०१० आणि २०११ मध्ये वाशिम जिल्ह्यातील २६८ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. दरम्यान, उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव, शाळा, बँकेचे खाते क्रमांक आदी माहितीचा सविस्तर अहवाल शिक्षण विभागाच्या संचालकांमार्फत एनसीईआरटी, नवी दिल्ली यांच्याकडे वेळेत पोहचणे क्रमप्राप्त होते.

मात्र, तत्कालिन शिक्षणाधिकारी विश्वास लबडे यांनी याकामी प्रचंड हलगर्जी करित अहवालच वेळेत पाठविला नाही. परिणामी, २६८ विद्यार्थ्यांना ४ वर्षांकरिता देय असलेली ६४ लाख ३२ हजार रुपये शिष्यवृत्तीची रक्कम जिल्ह्याला मिळाली नाही. दरम्यान, ६ वर्षाचा मोठा काल उलटूनही या गंभीर प्रश्नावर कुठलाच ठोस तोडगा काढण्याकामी शिक्षण विभागाने पुढाकार घेतलेला नाही. गोरगरिब कुटूंबातील विद्यार्थ्यांना देय असलेली शिष्यवृत्तीची थकीत रक्कम देण्यास ह्यएनसीईआरटीह्णने नकार दर्शविला असून ही रक्कम कामात कसूर करणारे तत्कालिन शिक्षणाधिकाकारी लबडे यांच्याकडून वसूल करावी, अशा सूचना दिल्या आहेत.

यासंदर्भात शिक्षण संचालक कार्यालयाच्या अधीक्षक रांगडे यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी देखील शिष्यवृत्तीच्या या प्रकरणाला दुजोरा देवून याबाबत तत्कालिन शिक्षणाधिकारी विश्वास लबडे यांच्यासह वाशिमच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयास नोटीस बजावण्यात आल्याची माहिती ह्यलोकमतह्णला दिली.⁠⁠⁠⁠