शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

१९ लाख शेतकऱ्यांच्या पदरी निराशा

By admin | Updated: January 5, 2015 04:42 IST

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासन मदतीची घोषणा ११ डिसेंबरला करण्यात आली. तब्बल २५ दिवसांचा कालाावधी उलटला असताना अद्याप

गजानन मोहोड, अमरावतीदुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासन मदतीची घोषणा ११ डिसेंबरला करण्यात आली. तब्बल २५ दिवसांचा कालाावधी उलटला असताना अद्याप शासन निर्णय निर्गमित झाले नाहीत. या पार्श्वभूमीवर अमरावती विभागातील १९ लाख ९४ हजार ६७२ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पदरी केव्हा व किती शासकीय मदत पडणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. दुष्काळाची प्रचलित निकषाची शासनाची मदतदेखील गुलदस्त्यात आहे, हे विशेष.खरीप २०१४ च्या हंगामात जून महिन्यापासून दीड महिना पावसाने दडी मारली. त्यामुळे मूग व उडीदसारखी ६० दिवसांचा कालावधी असणारी पिके बाद झालीत. ‘कॅश क्रॉप’ म्हणून ओळखले जाणारे सोयाबिनचे देखील निकृष्ट बियाणे, दुबार, तिबार पेरणी, रोगांचा प्रादुर्भाव, पीक फुलोऱ्यावर व शेंगा भरण्याच्या अवस्थेत पाऊस नसल्याने शेंगा पोचट राहिल्याने सरासरी ६० ते ८० टक्के उत्पन्न कमी झाले. क्विंटलऐवजी किलोची झडती आली. नापिकीच्या सत्रात शेतकरी सतत पिचला जात आहे. शासनाने ११ डिसेंबरला ३ हजार ९२५ कोटी रूपयांचे पॅकेज जाहीर केले. याबाबतचा शासन निर्णय न झाल्याने प्रशासकीय यंत्रणा ठप्प आहे. शेतकरी शासकीय मदतीच्या प्रतिक्षेत असताना महसूल यंत्रणेच्या याद्या अद्याप तयार करण्याचेही काम सुरू झालेले नाही.विभागाची पैसेवारी ४३ पैसे जाहीर झाली. विभागातील ७ हजार ३५६ गावांमधील ७ हजार २४१ गावात दुष्काळस्थिती घोषित करण्यात आली. यामध्ये अल्प, अत्यल्प व बहुभुधारक असलेल्या १९ लाख ९४ हजार ६७२ शेतकऱ्यांच्या ३३ लाख ८० हजार ४११ हेक्टरमधील खरिपाच्या पिकांचा समावेश आहे. अवकाळी पाऊस आणि दुष्काळी परिस्थितीत सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्याच्या पदरात प्रत्यक्षात किती आणि केव्हा मदत पडणार? यावर प्रश्नचिन्ह लागले आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी जाहीर झालेली शासकीय मदत देखील गुलदस्त्यात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्याची भावना आहे. रबीचा हंगाम दोन महिने उशीरा सुरू झाला. जमिनीत आर्द्रता नाही त्यामुळे हरभऱ्याची उगवण कमी झाली. विभागातील ५० हजारांवर हेक्टर क्षेत्र नापेर आहे. या पार्श्वभूमिवर शासन मदतीचा लाभ केव्हा मिळणार या प्रतीक्षेत शेतकरी आहेत.