शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

१९ तास गडचिरोलीकर राहिले अंधारात

By admin | Updated: July 21, 2016 20:02 IST

शहरानजीक असलेल्या कोटगल वीज उपकेंद्रातील ट्रॉन्सफॉर्मरमध्ये बिघाड निर्माण झाल्याने संपूर्ण गडचिरोली शहर, गडचिरोली तालुका व धानोरा तालुक्याच्या रांगी परिसराचा वीज

गडचिरोली : शहरानजीक असलेल्या कोटगल वीज उपकेंद्रातील ट्रॉन्सफॉर्मरमध्ये बिघाड निर्माण झाल्याने संपूर्ण गडचिरोली शहर, गडचिरोली तालुका व धानोरा तालुक्याच्या रांगी परिसराचा वीज पुरवठा बुधवारी रात्री ९ वाजता खंडित झाला. संपूर्ण रात्र व गुरूवारी दिवसभर विद्युत पुरवठा खंडित असल्याने नागरिकांचे हाल झाले. कोटगल येथील वीज उपकेंद्रातून गडचिरोली शहर, गडचिरोली तालुक्यातील बहुतांश गावे व धानोरा तालुक्यातील रांगी परिसराला वीज पुरवठा केला जातो. बुधवारच्या रात्री या उपकेंद्रातील ट्रॉन्सफॉर्मरमध्ये बिघाड निर्माण झाला. विद्युत कर्मचाऱ्यांनी सदर बिघाड दुरूस्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला यश आले नाही. त्यामुळे रात्री १.३० वाजता आरमोरीवरून विद्युत पुरवठा घेऊन कॉम्प्लेक्स परिसरात वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला. त्यानंतर गुरूवारी सकाळी ६.३० वाजेपासून कॉम्प्लेक्स परिसरात विद्युत पुरवठा खंडित करून सदर वीज गडचिरोली शहराच्या इतर भागांना देण्यात आली. मात्र गडचिरोली शहराचा लोड जास्त असल्याने ही लाईनसुद्धा ब्रेकडाऊन झाली. त्यानंतर दुपारी १२ वाजेपासून व्याहाडवरून वीज पुरवठा घेण्यात आला. मात्र गडचिरोली शहराचा लोड सांभाळत नसल्याने दुपारी दीड वाजता व्याहाडवरून येणारा वीज पुरवठा सुद्धा खंडित झाला. रात्री १० वाजेपासून वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कोटगल येथील ट्रॉन्सफॉर्मरमधील बिघाड शोधून तो दुरूस्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र यश आले नाही. त्यामुळे त्या ठिकाणी गुरूवारी नवीन ट्रॉन्सफॉर्मर लावण्यात आले. नवीन ट्रॉन्सफॉर्मर लावण्याची प्रक्रिया आटोपल्यानंतर वीज पुरवठा गुरूवारी दुपारी ४.२० वाजता पूर्ववत झाला