शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

१८ हजार हजयात्रेकरू मतदानाला मुकणार

By admin | Updated: September 15, 2014 04:28 IST

सण,उत्सवाला बाधा येणार नाही, अशी खबरदारी निवडणुका जाहीर करताना निवडणूक आयोगाने घेतली असली तरी राज्यातील सुमारे १८ हजार मुस्लीम भाविक मात्र याच काळात यंदाच्या हज यात्रेसाठी सौदी अरेबियाला रवाना

जमीर काझी, मुंबई सण, उत्सवाला बाधा येणार नाही, अशी खबरदारी निवडणुका जाहीर करताना निवडणूक आयोगाने घेतली असली तरी राज्यातील सुमारे १८ हजार मुस्लीम भाविक मात्र याच काळात यंदाच्या हज यात्रेसाठी सौदी अरेबियाला रवाना होत आहेत. ते २० आॅक्टोबरनंतर मायदेशी परतणार असल्याने हे नागरिक मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहतील.सौदी अरेबियामध्ये ४ आॅक्टोबरपासून हजच्या प्रमुख विधीला प्रारंभ होत आहे. त्यासाठी देशभरातील १ लाख ३६ हजार मुस्लीम सहभागी होणार असून, महाराष्ट्रातील १८ हजार यात्रेकरूंचा त्यात समावेश आहे. त्यापैकी ८ हजार १८१ हज कमिटी आॅफ इंडियाच्या माध्यमातून तर उर्वरित खासगी टूर कंपनीद्वारे यात्रेत सहभागी होत आहेत. खासगी कंपन्यांसाठी एकूण ३४ हजारांचा कोटा आहे. हे १८ हजार भाविक राज्यभरातील आहेत. एकाही ठिकाणी त्यांची संख्या निर्णायक नसली तरी मुस्लिमांना हक्काची व्होट बँक समजल्या जाणाऱ्या काँग्रेस आघाडी तसेच धर्मनिरपेक्ष पक्षाच्या उमेदवारांना त्याचा निश्चितच फटका बसणार आहे. ते भारतात परतेपर्यंत निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन नवीन सरकार कोणाचे हेही स्पष्ट झालेले असेल.इस्लाम धर्मातील प्रमुख पाच तत्त्वांपैकी हज यात्रा हे एक तत्त्व आहे. सौदी अरेबियात होणाऱ्या या यात्रेसाठी हज कमिटीमार्फत महाराष्ट्रातून औरंगाबाद, नागपूर व मुंबई येथील विमानतळांवरून रवाना होतात. त्यासाठी एकूण २९ विमानांची नोंदणी केलेली असून, ७ सप्टेंबरला औरंगाबादमधून यात्रेकरूंची पहिली तुकडी रवाना झाली. मुंबईतून हज कमिटीमार्फत ११ फ्लाईटमधून एकूण ४ हजार ५७५ भाविक रवाना होणार आहेत. १४ सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने भाविकांना पाठवण्यात येत आहे.हजचा विधी पूर्ण झाल्यानंतर पहिली तुकडी १९ आॅक्टोबरला परत येईल. त्यानंतर ६ नोव्हेंबरपर्यंत भाविकांचे मायदेशी आगमन होणार असल्याचे हज कमिटी आॅफ इंडियाचे उपमुख्याधिकारी एम.ए. पठाण यांनी सांगितले.