शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

आणखी १८ वस्तूंचे थेट पैसे मिळणार

By admin | Updated: March 8, 2017 00:46 IST

शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या खरेदीतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी लाभार्थ्यांना वस्तू विकत घेऊन देण्याऐवजी आता त्या वस्तूंची रक्कम थेट

मुंबई : शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या खरेदीतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी लाभार्थ्यांना वस्तू विकत घेऊन देण्याऐवजी आता त्या वस्तूंची रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला होता. या यादीत आता आणखी १८ वस्तूंचा समावेश केला आहे. खरेदीतून मलिदा खाणाऱ्यांवर वित्तविभागाने हा इलाज शोधला आहे.याआधी शासनाने जनावरांचे खाद्य वाटप, विजेवर चालणारे वैरण कापणी यंत्र, मासेमारीकरिता प्रगत यंत्रसामुग्री पुरविणे, कृषि अवजारे पुरविणे, मायक्रो ट्रॅक्टर व त्याची उपसाधने, बियाणे लघु हत्यारे वितरण, मधपेटया यंत्र वाटप, गणवेश व साडी वाटप, सायकल वाटप, पावर टिलर पुरविणे, गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल पुरविणे, स्वयंपाकाचा गॅस व सौरकुकर, सामुहिक विवाहाप्रसंगी वस्तु देणे, महिला बचत गटांना मोबाईल व्हॅन पुरविणे, बियाणे पुरवठा व वाटप, पीक संरक्षण उपकरणे, कामगंध सापळे, किटक नाशके, पाईपलाईन, ताडपत्री, लघुअंडी उबविणारी यंत्रे, मुरघास तयार करण्याची युनिट, मासेमारी साधने, कुक्कुटपालनाची शेड, शेळया बकऱ्यांसाठी शेड, कृषी पंप, वीज पंप, आॅईल इंजीन, यांत्रिकीकरण संबंधी साहित्यपुरवठा पाठ्यपुस्तके, गाईड्स, पिठाची गिरणी, शिलाई मशीन, चष्मा, विद्यार्थ्यांना टॅब व लॅपटॉप वाटप, आदी वस्तूंचा समावेश करण्यात आला होता. आता यात आणखी १८ वस्तूंचा समावेश करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतल्याचे मुनगंटीवार म्हणाले. यात प्रामुख्याने कृषी निविष्ठा, भूसुधारके, सूक्ष्म सिंचने साधने, शेळया, मेंढया व कोंबडया व त्यांचे संवर्धनासाठीचे साहित्य, दुग्ध व्यवसायीसाठीचे साहित्य, संरक्षित शेतीसाठीचे साहित्य, अच्छादन व अस्तरीकरण साहित्य, एकात्मिक कीड व अन्न व्यवस्थापन साठीच्या निविष्ठा, कृषी प्रक्रियेसाठीचे साहित्य व उपकरणे, रेशीम उत्पादनासाठीचे साहित्य व उपकरणे, कृषी माल हाताळणी व वाहतूक सामग्री, आवेष्टन, संकलन व प्रतवारी उपकरणे, स्वेटर, शाल, साबण, हेअर आॅईल, झेरॉक्स मशिन, टिनपत्रे या वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे.शासनाच्या योजनांचा थेट लाभ संबंधीतांना मिळावा, ही आपली भूमिका आहे. पण ठेकेदार आणि विक्रेते या योजनेत झारीतील शुक्राचार्याची भूमिका बजावतात असे आढळून आल्याने व परिणामी ज्यांना याचे लाभ मिळायला हवे त्यांना ते मिळत नसल्यानेच हा निर्णय घेण्यात आला आहे.- सुधीर मुनगंटीवार, वित्तमंत्री