शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत नोकरीचे अमिष दाखवून १८लाखाचा गंडा

By admin | Updated: October 17, 2016 21:30 IST

रेल्वेमध्ये टिकिट चेकर(टी.सी.)पदावर नोकरी लावून देण्याचे अमिष दाखवून तिघांची तब्बल १८ लाखाची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. १७ - रेल्वेमध्ये टिकिट चेकर(टी.सी.)पदावर नोकरी लावून देण्याचे अमिष दाखवून तिघांची तब्बल १८ लाखाची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला .गौतम शेळके (रा.किन्ही,ता,सोयगाव), सचिन पवार (रा.मयुरपार्क), वेदप्रकाश दुबे (रा. भोपाळ) आणि शैलेश खान (रा. कोलकोत्ता) अशी आरोपींची नावे आहेत. पो.निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांनी सांगितले की, नारेगावचे रहिवासी सुनील नवघरे हे रिक्षाचालक आहेत. आरोपी गौतम शेळके हा फिर्यादीच्या गावातील रहिवासी आहे. यामुळे त्यांच्यात जुनी ओळख आहे. नवघरे यांची पत्नी बेरोजगार आहे. दोन वर्षापूर्वी आरोपी शेळके हा नवघरे यांना भेटला आणि तुझ्या पत्नीला रेल्वेमध्ये नोकरी लावू शकतो, त्यासाठी ६ लाख रुपये लागतील असे सांगितले. गावचा माणूस असल्याने नवघरे यांचा त्याच्यावर विश्वास बसला. त्यांनी पैश्याची जमवाजमव केल्यानंतर आरोपीशी संपर्क साधला. आरोपी त्यांच्या घरी गेला.

तेथे त्यांच्याकडून आणि भारतभूषण खंदारे, अमोल पवार यांच्याकडून प्रत्येकी ७० हजार रुपये असे एकूण २ लाख १० हजार रुपये घेतले. ही रक्कम परीक्षेचे हॉलतिकिट आणि वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी घेतल्याचे आरोपींनी सांगितले. काही दिवसानंतर शेळके, पवार आणि दुबे हे तिघे नारेगावातील घरी गेले. तेथे त्यांनी हॉलतिकिट व वैद्यकीय प्रमाणपत्र दिले. उर्वरित रक्कम कोलकोत्ता येथील शैलेश खान यांच्याकडे द्यावी लागेल असे त्यांनी सांगितले. २०१४ च्या सुरवातीला १५ लाख ९० हजार रुपये तेथे नेऊन दिले.

बोगस ट्रेनिंग आणि नियुक्तीपत्रेआरोपींनी तक्रारदार यांच्या पत्नीसह तीन जणांना कोलकोत्ता येथे तीन महिने ट्रेनिंगसाठी ठेवले. तेथे त्यांना ट्रेनिंग दिल्यानंतर आरोपींनी त्यांना बोगस नियुक्तीपत्रेही दिली. ही नियुक्तीपत्रे देऊन त्यांना बिहारची राजधानी पाटना येथे हजर होण्यासाठी पाठविले. तर दुसऱ्या एकाला कटीहारच्या (बिहार) रेल्वेस्टेशनवर नियुक्ती झाल्याचे पत्र दिले.धनोदश वठला नाहीआरोपींनी आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच नवघरे यांनी त्यांना जाब विचारला आणि पैशाची मागणी केली. तेव्हा त्यांनी दोन धनादेश दिले. हे धनादेश तक्रारदारांनी बँकेत वटण्यासाठी टाकले असता ते अनादरीत झाले.