शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

उ. प्र.च्या १७ वर्षीय मुलीची औरंगाबादमध्ये आत्महत्या

By admin | Updated: July 29, 2016 21:45 IST

मोठ्या बहिणीकडे आलेल्या उत्तर प्रदेशातील एका १७ वर्षीय युवतीने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी बजाजनगरात घडली.

औरंगाबाद : मोठ्या बहिणीकडे आलेल्या उत्तर प्रदेशातील एका १७ वर्षीय युवतीने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी बजाजनगरात घडली.

शेख समिना शेख आफताब (१७ रा.कुसौरी जि.बस्ती उत्तर प्रदेश) ही मुलगी सहा महिन्यांपासून बजाजनगरातील आपली बहीण फरजाना रिजवान खान यांच्याकडे राहत होती. शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास रिजवान खान हे नमाज पढण्यासाठी बाहेर गेले होते. तर त्यांची पत्नी आपला लहान मुलगा रेहान यास शाळेतून घरी आणण्यासाठी गेली होती. फरजाना खान या मुलास दुपारी १.३० वाजेच्या सुमारास घेऊन घरी परतल्या असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी घरात प्रवेश करताच शेख समिना ही ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली.

फरजाना यांनी आरडाओरडा केला असता शेजारील नागरिकांनी ही माहिती त्यांच्या पतीला दिली. रिजवान खान यांनी बेशुद्धावस्थेतील शेख समिनाला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून तिला मयत घोषित केले. मुलीने आत्महत्या केल्याचे कळताच तिचे कुटुंबिय औरंगाबादला येण्यासाठी निघाले आहेत. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ.आर.डी. राजपूत करीत आहेत