शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

१७ विद्यार्थिनींना शिक्षणाचे ‘वाण’

By admin | Updated: January 25, 2015 00:59 IST

मकर संक्रांतीचा सण म्हणजे वाणवसा लुटण्याचा सण. सणानिमित्त सुवासिनीकडून एकमेकींना हळदीकुंकू आणि ऐपतीप्रमाणे भेटवस्तू दिल्या जातात.

नासीर कबीर - सोलापूरमकर संक्रांतीचा सण म्हणजे वाणवसा लुटण्याचा सण. सणानिमित्त सुवासिनीकडून एकमेकींना हळदीकुंकू आणि ऐपतीप्रमाणे भेटवस्तू दिल्या जातात. याच भेटवस्तू दरवर्षी एका गरजू विद्यार्थिनीला पायावर उभा राहण्यासाठी उपयोगी पडत आहेत. मकर संक्रांतीनिमित्त करमाळ्यात ओम महिला मंडळाने वाणासाठी भेटवस्तूंची देवघेव न करता त्यासाठी लागणारे पैसे एकत्र केले अन् त्या पैशातून एका गरीब मुलीला शिक्षणासाठी दत्तक घेऊन सावित्रीच्या लेकींनी आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. शहरातील ओम महिला मंडळ गेल्या १७ वर्षांपासून दरवर्षी आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या एका मुलीस शैक्षणिक दत्तक घेण्याचा उपक्रम राबवत आहे़ विशेष म्हणजे संक्रांतीच्या वाणासाठी जो खर्च होतो़ त्या खर्चातून हे मंडळ तिचा संपूर्ण वर्षाचा शैक्षणिक खर्च करीत आहे. गेल्या वर्षी या मंंडळाने श्रीदेवीचा माळ येथील मूकबधिर शाळेस भांडी दिली होती. शाळेतील दोन मुलांच्या शस्त्रक्रियेचा खर्चही त्यांनी केला होता. एका मुलीचे वडील अकाली मृत झाल्यानंतर तिचा शैक्षणिक खर्चही या महिला मंडळाने केला.कोणतीही अपेक्षा न ठेवता तसेच समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून आम्ही सामाजिक कार्यास सुरुवात केली आहे़ त्यानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या मुलीमुलांना शैक्षणिक मदत करण्याचे धोरण दरवर्षी राबवत असतो़ - अंजली श्रीवास्तव, अध्यक्षा, ओम महिला मंडळ, करमाळा