शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटीमुळे तिजोरीवर १५२८ कोटींचा भार !

By admin | Updated: August 2, 2015 02:56 IST

राज्य सरकारने आंशिक रूपात एलबीटी हटवून सर्व लहान व्यापाऱ्यांना दिलासा दिला असला तरी २५ महानगरपालिकांच्या महसूल भरपाईसाठी सरकारला तब्बल १५२८ कोटी रुपये खर्च येणार आहे.

- सोपान पांढरीपांडे,  नागपूरराज्य सरकारने आंशिक रूपात एलबीटी हटवून सर्व लहान व्यापाऱ्यांना दिलासा दिला असला तरी २५ महानगरपालिकांच्या महसूल भरपाईसाठी सरकारला तब्बल १५२८ कोटी रुपये खर्च येणार आहे.राज्यात सध्या ८,०९,५५३ व्यापारी एकूण ७६४८ कोटी रुपये एलबीटी भरतात. यापैकी ११६२ (०.१५ टक्के) व्यापाऱ्यांची उलाढाल ५० कोटींपेक्षा अधिक आहे व ते ८० टक्के म्हणजे ६१२० कोटी रुपये एलबीटी भरतात. उरलेल्या (९९.८५ टक्के) ८,०८,३९१ व्यापाऱ्यांची उलाढाल ५० कोटींपेक्षा कमी असून ते २० टक्के म्हणजे १५२८ कोटी एलबीटी भरतात.त्यामुळे राज्य सरकारने ९९.८५ टक्के व्यापाऱ्यांना एलबीटीमधून सूट देऊन तो फक्त ०.१५ म्हणजे ११६२ व्यापाऱ्यांसाठी कायम ठेवला आहे. यामुळे २५ महानगरपालिकांना(मुंबई वगळून) महसूल भरपाईसाठी १५२८ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. ही रक्कम शहरी विभागात जमा होणाऱ्या स्टॅम्प ड्युटीमधून सरकार देणार आहे. ही व्यवस्था १ आॅगस्टपासून लागू झाली आहे. त्यापूर्वी १ एप्रिल ते ३१ जुलै या कालावधीत या महानगरपालिकांचा जो महसूल बुडाला त्यासाठी सरकारने २०४८ कोटी रुपये पूरक मागण्यांद्वारे उभे केले आहेत.योजना यशस्वी होईल?याबाबत फेडरेशन आॅफ असोसिएशन्स आॅफ महाराष्ट्रचे (फॅम) अध्यक्ष मोहन गुरनानी म्हणाले, सरकारने कुठलाही नवा कर न लावता सर्व छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा दिला आहे, हे स्वागतार्ह आहे. पण ११६२ मोठे व्यापारी कसे वागतात, त्यावर योजनेचे यश अवलंबून आहे. या व्यापाऱ्यांनी व्यापार शहराबाहेर नेला किंवा अनेक फर्म्समध्ये विभाजित केला तर महानगरपालिकांना महसूल मिळणार नाही व तो बोझा सरकारवरच पडेल.एलबीटी आणि जीएसटीच्देशात जीएसटी लागू झाला की एलबीटीसह सर्व व्यापारी कर त्यात समाविष्ट होणार आहेत. जीएसटीचे विधेयक सध्या राज्यसभेच्या सिलेक्ट कमिटीकडे आहे व त्यावर एकमत तयार करण्याचे काम सुरू आहे. समिती त्यावर ९ आॅगस्टपूर्वी अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर विधेयक मंजूर होईल व १ एप्रिलपासून जीएसटी लागू होण्याचा मार्ग सुकर होईल.