शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

हेक्सवर्ल्ड प्रकरणात १५० तक्रारी

By admin | Updated: August 11, 2015 01:33 IST

तळोजा येथील हेक्सवर्ल्ड गृहप्रकल्पात फसवणूक झालेल्या १५० ग्राहकांनी अद्यापपर्यंत पोलिसांशी संपर्क साधला आहे. एकूण २३४४ ग्राहकांचा समावेश असलेल्या या प्रकल्पात

नवी मुंबई : तळोजा येथील हेक्सवर्ल्ड गृहप्रकल्पात फसवणूक झालेल्या १५० ग्राहकांनी अद्यापपर्यंत पोलिसांशी संपर्क साधला आहे. एकूण २३४४ ग्राहकांचा समावेश असलेल्या या प्रकल्पात कोट्यवधीचा अपहार झाला असून या प्रकरणात तक्रारदारांच्या दिरंगाईमुळे पोलिसांना दोषारोपपत्र तयार करण्यास विलंब होत आहे. ग्राहकांकडून पैसे घेवून वेळेत प्रकल्प पूर्ण न झाल्याने तळोजा येथील देविशा इन्फ्रास्ट्रक्चरमार्फत होणारा हेक्सवर्ल्ड गृहप्रकल्प वादात आला आहे. या प्रकल्पात घर घेण्यासाठी २३४४ ग्राहकांनी पैसे गुंतवले होते. परंतु २००९ पासून सुरु असलेला हा प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नाही. हा प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा अशी मागणी करूनही ग्राहकांना दाद मिळाली नाही. त्यामुळे झालेल्या फसवणुकीची तक्रार ग्राहकांनी गुन्हे शाखा पोलिसांकडे केली आहे. त्यानुसार माजी बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर व मुलगा पंकज यांच्यासह राजेश धारप, सत्यन केसरकर व अमित बलराज या पाच संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळोजा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या या गुन्ह्णाचा तपास गुन्हे शाखेचा आर्थिक विभाग करत आहे. त्यांनी २५ एकर जागेच्या या प्रकल्पासाठी २३४४ ग्राहकांकडून बुकिंगसाठी ४४ कोटी ४ लाख रुपये घेतले होते. त्यापैकी अवघे १५० ग्राहकांनी पोलिसांशी संपर्क साधला.मागील आठवड्यापर्यंत अवघ्या ७५ ते ८० ग्राहकांनी पोलिसांशी संपर्क साधला होता. त्यानंतर गुन्हे शाखेने केलेल्या आवाहनामुळे त्यात भर पडून तक्रारदारांचा आकडा दुप्पट झाला आहे. परंतु २३४४ ग्राहकांपैकी १५० तक्रारदार पुढे आले आहे. प्रकल्पाचे धागेदोरे थेट राजकारण्यांशी जोडले गेल्यानेही अनेक जण तक्रारीसाठी पुढे येत नसल्याची शक्यता आहे. परंतु या प्रकरणातील अधिकाधिक तक्रारदार समोर येतील अशी पोलिसांना आशा आहे. (प्रतिनिधी)