शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
3
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
4
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
5
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
6
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
7
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
8
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
9
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
10
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
11
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
13
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
14
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
15
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
16
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
17
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
18
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
19
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
20
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...

किडनीच्या आजाराने १४ जणांचा मृत्यू

By admin | Updated: August 13, 2014 00:45 IST

कळमेश्वर तालुक्यातील पानउबाळी येथे फ्लोराईडयुक्त पाण्यामुळे गेल्या वर्षभरात १४ लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच ८ ते १० रुग्णांवर उपचार सुरू आहे. यामुळे गावातील लोकांत भीतीचे वातावरण

जिल्हा परिषद : सायकल अन् जलशुद्धीकरण घोटाळा गाजलानागपूर : कळमेश्वर तालुक्यातील पानउबाळी येथे फ्लोराईडयुक्त पाण्यामुळे गेल्या वर्षभरात १४ लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच ८ ते १० रुग्णांवर उपचार सुरू आहे. यामुळे गावातील लोकांत भीतीचे वातावरण असल्याची धक्कादायक माहिती जिल्हा परिषदेतील विरोधीपक्षनेते मनोहर कुंभारे यांनी मंगळवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत दिली. मृतांमध्ये किसन शिवणकर, आनंदराव ढोणे, यमुनाबाई डहाट, शंकरराव वानखडे, केशवराव नारनवरे, किसन बाबडे, संतोषराव ढोणे, सूर्याबाई धुंदे, सुमित्रा वाडीवा , रावण सालमुरकर, रमेश मुनघाटे व हिरुबाई जुनघरे आदींचा समावेश आहे. तसेच स्मिताबाई बाबळे (५५) व किशनदेव जुनघरे (६०) यांच्यावर नागपुुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. इतरही अनेक लोकांना किडनीच्या आजाराने पछाडले आहे. अशुद्ध पाणीपुरवठ्याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कुंभारे यांनी केली. गावातील पाणी नमुने तपासणीसाठी तातडीने प्रयोगशाळेकडे पाठवा, गावाला सुरू असलेला पाणीपुरवठा बंद करून पर्यायी उपययोजना करण्याचे निर्देश उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले व मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिले. यात आरोग्य विभागातील अधिकारी जबाबदार असल्यास त्यांचेवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही चिखले यांनी दिली.महिला व बाल कल्याण विभागामार्फत विद्यार्थ्यांना करण्यात आलेल्या सायकल वाटपात लाखों रुपयांचा घोटाळा झाला आहे. एकाच विद्यार्थ्यांच्या नावाने ८ ते १५ सायकली उचलण्यात आल्या आहेत. यामुळे जि.प.ची बदनामी होत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सदस्यांनी केली. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनाही सायकली मिळाल्या नसल्याचे शांता कुमरे यांनी निदर्शनास आणले. तालुका स्तरावरून आलेल्या नावांनुसार यादी मंजूर करण्यात आल्याची माहिती महिला व बाल कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. काही ठिकाणी अनुसूचित जातीचे लाभार्थी न मिळाल्याने त्यांना वाटप करता आले नाही. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती गठित करण्याची घोषणा अध्यक्ष संध्या गोतमारे यांनी केली. शाळांना बंद असलेली जलशुद्धीकरण यंत्रे पुरविण्यात आल्याच्या मुद्यावरून चांगलाच गोंधळ झाला. उपासराव भुते यांनी हा प्रश्न उपस्थित केला. तेराव्या वित्त आयोगातून शाळांना ७७४ जलशुद्धीकरण यंत्रे पुरविण्यात आली. ती चांगल्या कंपनीची नसल्याने यावर आक्षेप घेण्यात आले. या यंत्रांचा शासन स्तरावरून पुरवठा झाल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. याची सदस्यांना कल्पना न दिल्याबाबत जयकुमार वर्मा व उकेश चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली.कन्हान येथील अंगणवाडीतील बालकांना पोषण आहार वाटपात गैरप्रकार झाल्याचा आरोप सदस्यांनी केला. याबाबत चुकीचा अहवाल देण्यात आला. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी सदस्यांनी केली. मनसर भागातील काही शाळांत विद्यार्थ्याच्या गणवेश वाटपात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पुष्पा गायकवाड यांनी केला. शालेय गणवेशाची खरेदी स्थानिक स्तरावर व्यवस्थापन समिती करते. या प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याचे निर्देश अध्यक्षांनी दिले.(प्रतिनिधी)