शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मुलुंड राड्यातील आरोपींना १४ दिवसांची कोठडी

By admin | Updated: October 14, 2016 03:21 IST

पालिकेतील भ्रष्टाचाराचा रावण दहनावरून दसऱ्याच्या दिवशी सेना आणि भाजपामध्ये झालेल्या राड्याप्रकरणी नवघर पोलिसांनी आतापर्यंत १४ आरोपींना अटक केली

मुंबई : पालिकेतील भ्रष्टाचाराचा रावण दहनावरून दसऱ्याच्या दिवशी सेना आणि भाजपामध्ये झालेल्या राड्याप्रकरणी नवघर पोलिसांनी आतापर्यंत १४ आरोपींना अटक केली आहे. मुलुंड दंडाधिकारी न्यायालयाने सर्व आरोपींना २७ आॅक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असून, आरोपींच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आणल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी मुलुंडच्या नीलमनगर मैदानात भ्रष्टाचाररूपी रावण दहनाची तयारी सुरू असताना सेनेच्या कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम उधळून लावला. सेना आणि भाजपाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यात भाजपाचे सहा कार्यकर्ते आणि सेनेचे तीन कार्यकर्ते जखमी झाले. सेनेच्या कार्यकर्त्यांवर कारवाईची मागणी करीत भाजपा नेत्यांनी आंदोलन केल्यानंतर नवघर पोलिसांनी या प्रकरणी मारहाणीचा गुन्हा दाखल करून ५ जणांना अटक केली होती. भाजपाच्या नेत्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा आणखी नऊ जणांना पोलिसांनी अटक केली.नवघर पोलिसांनी अटक केलेल्या उपविभाग प्रमुख जगदीश शेट्टी, अनंत म्हाब्दी, महेंद्र वैती, शाखाप्रमुख अविनाश बागुल, दीपक सावंत, आनंद मुंडे, महेश चवरे, बाबा भगत, दिनेश जाधव, उपशाखाप्रमुख सुनील गारे, नीलेश ठाकूर, किरण नांदे, नीलेश सावंत, किशोर भोईर यांना आज दुपारी मुलुंड दंडाधिकारी न्यायालयात हजर केले. आमदार सुनील राऊत, आमदार अ‍ॅड. अनिल परब, दत्ता दळवी यांच्यासह शेकडो शिवसैनिक या ठिकाणी गोळा झाले होते. त्यामुळे पोलिसांनी न्यायालयाच्या आवारात बॅरिकेट्स लावून कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. न्यायालयाने सर्व आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. (प्रतिनिधी)