शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

आईने लावले १३ वर्षीय मुलीचे लग्न

By admin | Updated: May 7, 2017 04:49 IST

गरिबीला कंटाळून आईने अवघ्या १३ वर्षांच्या मुलीचा विवाह ४० वर्षांच्या टॅक्सी चालकासोबत करुन दिला. त्यानंतर त्यानेही तिला

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गरिबीला कंटाळून आईने अवघ्या १३ वर्षांच्या मुलीचा विवाह ४० वर्षांच्या टॅक्सी चालकासोबत करुन दिला. त्यानंतर त्यानेही तिला काही समजण्याच्या आतच तिच्यावर लैंगिक अत्याचार सुरु केले. त्याच्या तावडीतून तिने पळ काढत आईकडे धाव घेतली. मात्र आईनेही तिला मारहाण करत पुन्हा त्याच्याकडेच पाठविण्याचा प्रयत्न केल्याने तिने तेथून पळ काढला आणि थेट पोलिसांना याबाबत कळविले. त्यांच्या मदतीने तिची सुटका करण्यात आल्याची घटना माहीममध्ये शनिवारी उघडकीस आली. माहीमच्या नयानगर परिसरात १३ वर्षांची नेहा आई व दोन बहिणींसह राहते. वडिलांच्या निधनानंतर तिने शाळा सोडली आणि आईला घरकामात मदत करु लागली. मात्र आर्थिक चणचणीमुळे आईला मुलींचा भार वाटू लागला. याच दरम्यान एका ४० वर्षांच्या वांद्रे येथील टॅक्सी चालकाचे स्थळ तिच्यासाठी आले. आईने नेहाच्या इच्छेविरुद्ध आसीफ आयुब खानसोबत २० मार्च रोजी तिचा विवाह लावला. विवाहानंतर आसीफने तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. त्याच्या अत्याचाराला कंटाळून नेहाने २९ एप्रिल रोजी घरातून पळ काढत, आईकडे धाव घेतली. मात्र आईने तिला मारहाण करुन त्याच्याकडे पाठविले. त्यानंतर ५ मे रोजी आसीफसोबत ती आईकडे आली. तेथे तिने आसीफसोबत न जाण्याचा निर्णय घेतला. त्याच रागात आईने मारहाण केल्याने तिने शेजारील रहिवाशांच्या घरात बंद करुन घेतले. तेथील महिलेच्या मोबाइलवरून पोलीस नियंत्रण कक्षास या घटनेची माहिती देत आपली सुटका केली.आरोपींना ८ मेपर्यंत कोठडीपोलिसांनी ३५ वर्षांच्या आईसह पती आसीफ आयुब खान (३८) आणि लग्न लावून देणारा अहमद राजम मोहम्मद शेख (३८) अशा तिघांनाही अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना ८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.