शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

१२२ आॅटोरिक्षांवर कारवाई

By admin | Updated: September 2, 2014 01:14 IST

प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहरने १ सप्टेंबरपासून आॅटोरिक्षा मीटरने चालण्याची सक्ती केली आहे. त्यानुसार आज सकाळपासून चार पथकाच्या मदतीने आॅटोंची तपासणी करण्यात आली.

आरटीओची धडक मोहीम : ७७ आॅटोंना नोटीस तर ४५ जप्त नागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहरने १ सप्टेंबरपासून आॅटोरिक्षा मीटरने चालण्याची सक्ती केली आहे. त्यानुसार आज सकाळपासून चार पथकाच्या मदतीने आॅटोंची तपासणी करण्यात आली. यात १२२ आॅटोरिक्षा विना मीटर धावत असल्याचे आढळून आले. यातील ७७ आॅटोंना नोटीस बजावण्यात आली असून ४५ आॅटोंवर जप्तीची कारवाई करण्यात आली. दिवसभर चाललेल्या या मोहिमेमुळे आॅटोचालकांमध्ये दहशतीचे वातावरण होते. अनेकांनी आॅटोरिक्षा रस्त्यावरच आणल्या नाहीत. परिणामी अनेक प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. आॅटोरिक्षा प्रवासी भाड्यात वाढ करण्याचा आणि आॅटो मीटरने चालविण्याच्यासाठी तपासणी मोहीम हाती घेण्याचा निर्णय केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी व जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांच्या उपस्थितीत नुकताच घेण्यात आला. त्यानुसार सोमवारपासून कारवाईला सुरुवात करण्यात आली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (शहर) विजय चव्हाण यांनी सांगितले, आज सकाळी ९ वाजतापासून तपासणी मोहिमेला सुरुवात झाली. साधारण दीड हजाराच्यावर आॅटोरिक्षांची तपासणी करण्यात आली. यात आॅटोरिक्षा परवानाधारकाने मीटर प्रमाणे न चालणे, सदोष मीटरचा वापर करणे, मीटर नसताना वाहन वापरणे, मीटर सील तुटलेले असताना वाहनाचा वापर करणे, खोटे दरपत्रक वाहनात ठेवणे आदी बाबी तपासण्यात आल्यात. यात १२२ आॅटोरिक्षे दोषी आढळून आले. यातील ७७ आॅटोंना नोटीस बजावण्यात आली तर ज्या आॅटोंमध्ये गंभीर स्वरुपातील त्रुटी होत्या त्यांना जप्त करण्यात आल्या. (प्रतिनिधी)अन् आॅटो मीटरने धावलेकारवाईच्या धास्तीने का होईना शहरात आज बऱ्याच वर्षानंतर आॅटो मीटरने धावत असल्याचे चित्र दिसून आले. अनेक प्रवासी सीटनुसार चलण्याचा आग्रह करीत असताना आॅटोचालक मीटरनेच चालणार, या भूमिकेवर ठाम होते. आॅटो भाडेदरातील वाढ आणि मीटरच्या सक्तीमुळे काही प्रवाशांमध्ये नाराजी तर काहींमध्ये उत्साहाचे वातावरण होते. ९० हजार रुपयांचा दंडसोमवारी सकाळपासून सुरू झालेल्या या धडक मोहिमेत दोषी आढळून आलेल्या आॅटोचालकांना ९० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. विशेष म्हणजे, सुधारित दंडसूची अनुसार विभागीय कारवाईअंतर्गत दंड आकारण्यात आला. यात एक हजार तडजोड शुल्क आणि दोन हजार रुपये विभागीय कारवाई असा एकूण तीन हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई प्रादेशिक परिवहन अधिकारी (शहर) सर्जेराव शेळके यांच्या मार्गशर्दनात, विजय चव्हाण यांच्या नेतृत्वात सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी दत्ता सांगोळकर, मोटार वाहन निरीक्षक प्रशांत कंकरेज, नरेंद्र कठाणे, उज्ज्वल भावसार, मोनिका राठोड व आरटीओ कर्मचाऱ्यांच्या मदतीने करण्यात आली.