शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

१२० पीयूसी मशिन धूळ खात

By admin | Updated: November 3, 2015 02:57 IST

अवजड व व्यावसायिक वाहन रस्त्यावर धावण्यास खरोखरच सक्षम आहेत का, त्याची निकषाप्रमाणे तपासणी करून आरटीओ कार्यालयांकडून फिटनेस प्रमाणपत्र दिले जाते. यात ‘पीयुसी’

- सुमेध वाघमारे,  नागपूरअवजड व व्यावसायिक वाहन रस्त्यावर धावण्यास खरोखरच सक्षम आहेत का, त्याची निकषाप्रमाणे तपासणी करून आरटीओ कार्यालयांकडून फिटनेस प्रमाणपत्र दिले जाते. यात ‘पीयुसी’ तपासणीही महत्त्वाचे ठरते. म्हणूनच शासनाने २००० ते आतापर्यंत राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांना १२० पीयुसी मशीनचा पुरवठा केला. तर दिव्याची प्रखरता किती व कशा पद्धतीची आहे, हे तपासण्यासाठी ५० ‘हेडलाईट एनलायझर यंत्र’ दिले. मात्र, कार्यालयांत या दोन्ही यंत्राचा वापरच होत नाही. परिणामी, या मशीन्सवर झालेला शासनाचा साधारण अडीच कोटीवर पाणी फेरले आहे.प्रत्येक वाहनांसाठी पियुसी म्हणजेच ‘पोल्युशन अंडर कंट्रोल सटीर्फिकेट’ असणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र यातील बहुसंख्य पीयुसी केंद्र नियम धाब्यावर ठेऊन वाहनाला पियुसी प्रमाणपत्र देतात. ‘लोकमत’ने अनेकवेळा हा प्रकार उघडकीसही आणला आहे. याची दखल म्हणून २००० मध्ये परिवहन विभागाने राज्यातील ३५ प्रादेशिक परिवहन कार्यालयांना डिझेल व पेट्रोलवरील वाहनांसाठी ७० पीयूसी मशीन्स दिले. मात्र आरटीओ कार्यालयात योग्यता प्रमाणपत्रासाठी (फिटनेस) येणाऱ्या वाहनांची या यंत्रांवर तपासणीच केली जात नाही. विशेष म्हणजे, या यंत्राचा वापर होत आहे की नाही, यंत्र सुरू आहे की बंद याची माहिती न घेताच परिवहन विभागाने आॅक्टोबर २०१५ मध्ये ५० आरटीओ कार्यालयांना पुन्हा प्रत्येकी एक पीयुसी मशीन पाठविले. प्रत्येक मशीन दोन लाखांची आहे. राज्यातील आरटीओ कार्यालयात तर तीन-तीन पीयुसी मशीन असताना त्याचा वापर नाही. पीयुसी केंद्रावरून काढलेल्या पीयुसी प्रमाणपत्रालाच ग्राह्य मानून त्याआधारे आरटीओ कार्यालय फिटनेस प्रमाणपत्र देत आहे. यामुळे या प्रमाणपत्रावर शंका आहे.