शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

12 वर्षीय मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2016 20:14 IST

मुलाला काही कळायच्या आतच गावातून मुलाला घेऊन पसार होत बालकाच्या अपहरणाचा प्रयत्न केला

ऑनलाइन लोकमतखामगाव, दि. 16 -  बुलढाण्यात अज्ञात इसमाने नातेवाईकाचे घर दाखविण्याचा बहाणा करून १२ वर्षीय मुलास मोटारसायकलीवर बसविले व मुलाला काही कळायच्या आतच गावातून मुलाला घेऊन पसार होत बालकाच्या अपहरणाचा प्रयत्न केला. मात्र मुलाच्या सतर्कतेने हा अपहरणाचा प्रयत्न फसला. ही घटना रविवारी तालुक्यातील शिर्ला नेमाने येथे घडली.खामगाव तालुक्यातील शिर्ला नेमाने येथील सुमेध साहेबराव सदांशिव (वय १२) हा रविवारी घरासमोर खेळत असताना मोटारसायकलने आलेल्या अज्ञात इसमाने सुमेधला नातेवाईकांचे घर दाखव, अशी बतावणी करीत सुमेधला मोटारसायकलीवर बसवून गावातून पळ काढला. यानंतर सदर बालकास अकोला जिल्ह्यातील मळसुर शिवारात नेवून सुमेधला मारहाण केली. यामध्ये सुमेधचे डोके फुटले. दरम्यान याच रस्त्याने समोरून येणाऱ्या वाहनामुळे अज्ञात इसम मुलाच्या बाजुला झाला ही वेळ व प्रसंगावधान साधून मुलाने पळ काढला. त्यानंतर सुमेधला भेटलेल्या नागरीकांनी चौकशी केली असता सुमेधने आपली आपबिती कथन केली. मात्र तोपर्यंत अपहरणकर्ता पसार झाला. मळसुर येथील नागरीकांनी सुमेधवर औषधोपचार करून त्याचे कुटुंबीयांशी संपर्क करुन त्याला कुटुंबीयांचे ताब्यात दिले. या घटनेची उपरोक्त आशयाची फिर्याद सुमेधचे वडिलांनी हिवरखेड पोलीस स्टेशनला दिली. या तक्रारीनुसार पोलिस तपास करीत आहेत.