शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

स्वच्छतेसाठी विद्यार्थ्यांंना १२ सत्र!

By admin | Updated: October 16, 2016 02:16 IST

युनिसेफचे सहकार्याने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा उपक्रम.युनिसेफचे सहकार्याने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा उपक्रम.

हर्षनंदन वाघ बुलडाणा, दि. १५-भारत सरकारने १ ऑक्टोबरपासून संपूर्ण देशात स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली असून, राज्यशासनाने १ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान स्वच्छ विद्यालय, स्वच्छ महाराष्ट्र मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत स्वच्छ शाळांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. मात्र शाळेतील विद्यार्थ्यांंंना स्वच्छतेच्या सवयी लावण्यासाठी विद्यार्थ्यांंंना मनोरंजक पद्धतीने १२ सत्रे देण्याचा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर मनोरंजक पद्धतीने राबविण्याचा १२ सत्राचा कार्यक्रम युनिसेफतर्फे तयार करण्यात आला असून हा उपक्रम १२ आठवडे चालणार आहे. स्वच्छतेच्या सवयी विद्यार्थ्यांंंंना लागाव्यात यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून मनोरंजक पद्धतीने राबविण्याचे स्वातंत्र राज्यातील सर्वच शाळांना देण्यात आले आहे; मात्र उपक्रम राबविण्याची जबाबदारी सर्वच शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांवर राहणार आहे. १ ते ७ व्या वर्गातील मुलांसाठी राबविण्यात येणार्‍या या सत्रामध्ये प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे मनोरंजक पद्धतीने खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांंंना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे. हे आहेत स्वच्छतेचे १२ सत्र१-चमकीला चेंडू, २-राजू-संजूची गोष्ट, ३-हात धुण्याचे गाणे, ४-साबणाने हात धुण्याची शर्यत, ५-हात, पाणी आणि साबण, ६-बिट्ट, ७-सोबती आणि साबण, ८-पाणी से साबून मिलाते चलो, ९-कचरा गोळा करून त्याचे व्यवस्थापन करण्याची शर्यत, १0-चूक की बरोबर ओळखणे, ११-जोड्या लावणे, १२-चालता बोलताअसे आहे स्वच्छतेचे गाणेसर्वात आधी होतो..हात ओलामग हातावर नाचतो..साबण रंगिलाशब्बास, हाताला मिळते मग..हाताची साथनंतर मग वळून पुढे मागे.. खेळे हातअसे, खेळा खेळा दहा ..बोटांत शिरूनमग चालवा नखांनी..छन छना छन चक्करहात करती पाण्यात..छमछम छमकारण स्वच्छ हातामध्ये आहे दमशाळेतील विद्यार्थ्यांंंंना स्वच्छतेच्या सवयी लावण्यासाठी विद्यार्थ्यांंंंना मनोरंजक पद्धतीने १२ सत्र देण्याचा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर उपक्रम जिल्ह्यातील शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. - अशोक सोनवने, शिक्षणाधिकारी, बुलडाणा