शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

‘एक्स्प्रेस वे’वर १२ किमीचा उन्नत मार्ग

By admin | Updated: September 25, 2016 00:48 IST

मुंबई-पुणे या दोन शहरांचा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे मुळे झपाट्याने विकास झाला. यामुळे येथील वाहतूक प्रचंड प्रमाणात वाढली. आताच त्यावर एखादा अपघात झाल्यास मोठ्या प्रमाणात

- नारायण जाधव, ठाणे

मुंबई-पुणे या दोन शहरांचा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे मुळे झपाट्याने विकास झाला. यामुळे येथील वाहतूक प्रचंड प्रमाणात वाढली. आताच त्यावर एखादा अपघात झाल्यास मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. यावर उपाय म्हणून रस्ते विकास महामंडळाने खोपोली एक्झिट ते कुसगाव रस्ता अर्थात सिंहगड संस्थेदरम्यान १२ किमी लांबीचे दोन बोगदे असलेल्या आठपदरी नवीन रस्त्यासह खालापूर येथील फूड मॉल ते खोपोली इंटरचेंज असा आठपदरी उन्नतमार्गाचे नियोजन केले असून त्यासाठीच्या सुमारे ३ हजार २१५ कोटींच्या खर्चास राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय मान्यता दिल्याने निविदा काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.भविष्यात या परिसरात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना शहरासह रस्ते विकास महामंडळ स्वत:ही त्याच्या दोन्ही बाजंूच्या दोन किमी परिसराचा विकास करणार आहे. याशिवाय, सिडकोचा एसईझेड प्रकल्प, जेएनपीटीच्या विस्तारास सुरुवात झाली आहे. हे प्रकल्प आणि नवीन शहरे पाहता या मार्गावरील वाहतुकीचा ताण वाढणार आहे. या दोन्ही कामांसाठी लागणारा निधी रस्ते विकास महामंडळाने उभारावयाचा असून आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक निविदा मागवून त्यांचे काम पूर्ण करण्यास सांगितले आहे. तत्पूर्वी महामंडळाने विश्लेषणात्मक आर्थिक फायद्याचा विचार करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करायचा आहे. राज्य शासनाने या ३२१५ कोटींच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देताना रस्ते विकास महामंडळास या मार्गासाठी दिलेला सवलत कालावधी ३० एप्रिल २०३० ऐवजी आता ३१ जुलै २०३५ पर्यंत वाढवून दिला आहे.मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे च्या क्षमतेत वाढ करण्यासाठीच्या ३२१५ कोटींच्या खर्चास मंत्रिमंडळ पायाभूत समितीने ३० नोव्हेंबर २०१५ रोजीच मान्यता दिली आहे. मात्र, त्याचा शासन निर्णय निघालेला नव्हता. मंगळवारी ती प्रक्रियाही पूर्ण झाल्याने येत्या आठ दिवसांत या दोन्ही कामांच्या तांत्रिक आणि आर्थिक निविदांच्या प्रक्रियेस सुरुवात करण्यात येईल. त्यानंतरच बांधकामाच्या निविदा काढून प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात येईल.- राधेश्याम मोपलवार, व्यवस्थापकीय संचालक,महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ