शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी भुजबळांसह 12 जणांवर गुन्हे दाखल

By admin | Updated: May 26, 2016 22:04 IST

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

डिप्पी वांकाणी

मुंबई, दि. 26- महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी गुरुवारी छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांसह 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुजबळ कुटुंबीयांनी उत्पन्नाच्या स्रोतापैकी 7152.50 टक्क्यांपेक्षा अधिक मालमत्ता जमवल्याचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ठपका ठेवला आहे. एसीबीच्या माहितीनुसार, कुटुंबीयांनी 1999-2014पर्यंत स्वतःच्या कंपन्यांचे शेअर्स अवास्तव किमतीनं विकून 203.24 कोटींची मालमत्ता जमा केली. छगन भुजबळ, त्यांची पत्नी मीना भुजबळ, मुलगा पंकज भुजबळ,  पुतण्या समीर भुजबळ, सून विशाखा भुजबळ, सुनेचा सीए सुनील नाईक, हवाला ऑपरेटर सुरेश जजोडिया, प्रवीण जैन, संजीव जैन, सीएम चंद्रशेखर सर्डा, कपिल पुरी यांच्याविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या 12 जणांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 13(1) ई आणि 13(2) गुन्हा नोंदवला आहे. एसीबीच्या मते, छगन भुजबळांनी 87 लाख 16 हजार 116 रुपयांची मालमत्ता पगारातून कमावली आहे. तर शेतीच्या माध्यमातून 1 कोटी 62 लाख 20 हजार 037 रुपयांची मालमत्ता जमवली आहे. तर त्यांची पत्नी मीना यांनी कृषी व्यवसायातून 36 लाख 88 हजार 322 रुपयांची मालमत्ता जमवली असून, त्यांची एकूण मालमत्ता 28624475 कोटींच्या घरात आहे. 1999-2014च्या दरम्यान भुजबळांकडे 3688322 कोटींची मालमत्ता आढळून आली असून, ती त्यांच्या उत्पन्नाच्या 32 टक्क्यांनी अधिक आहे. त्याप्रमाणेच पंकज भुजबळ आणि पत्नी विशाखा भुजबळांनी पगारातून 44 लाख 86 हजार 944 रुपयांची मालमत्ता कमावली आहे.
तर कृषी व्यवसायातून 23423549 कोटींची मालमत्ता कमावली आहे. मात्र एसीबीला 27910493 कोटींची मालमत्ता सापडली असून, ती त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोताच्या 45 ते 45.27 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. छगन भुजबळांनी हवाल्याचा पैसा लपवण्यासाठी पंकज, समीर भुजबळांच्या नावे बनावट कंपन्या स्थापन केल्या आणि कोलकात्यातल्या हवाला ऑपरेटरशी संपर्क साधून या बनावट कंपन्यांचे शेअर्स अवास्तव किमतीनं विकण्यात आले. हवाला ऑपरेटरनंही हे शेअर्स किमतीपेक्षा जास्त पैसे मोजून खरेदी केले. ईडीनं या प्रकरणाची चौकशी केली असता हे गुंतवणूकदार फक्त कागदोपत्री दाखवण्यात आले आहेत, मात्र ते अस्तित्वात नाहीत, ही माहिती चौकशीतून समोर आली आहे.