शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
4
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
5
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
6
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
7
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
8
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
9
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
10
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
11
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
12
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
13
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
14
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
15
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
16
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
17
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
18
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
19
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
20
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील

राज्यात पावसाचे ११ बळी!

By admin | Updated: May 28, 2014 13:24 IST

मुसळधार पावसाने मंगळवारी मध्य महाराष्टÑासह नाशिकला झोडपून काढले़ सोलापूर आणि सातारा जिल्ह्णात प्रत्येकी तिघांचा, नाशिक, पुणे जिल्ह्णात दोघांचा आणि कोल्हापूर जिल्ह्णात एकाचा वीज कोसळून मृत्यू झाला़

मुंबई : वादळी वार्‍यासह झालेल्या मुसळधार पावसाने मंगळवारी मध्य महाराष्ट्रासह नाशिकला झोडपून काढले़ सोलापूर आणि सातारा जिल्ह्णात प्रत्येकी तिघांचा, नाशिक, पुणे जिल्ह्णात दोघांचा आणि कोल्हापूर जिल्ह्णात एकाचा वीज कोसळून मृत्यू झाला़ अनेक घरांवरील पत्रे उडून गेली, तर शेकडो वृक्षे उन्मळून पडली़ काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला होता़ सातारासह कºहाड, फलटण, कोरेगाव, खंडाळा, वाई, महाबळेश्वर तालुक्याला मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास मुसळधार पावसाने झोडपून काढले. खंडाळा तालुक्यातील धावडवाडीत वीज पडल्याने निखिल चंद्रकांत शिंदे (२२) व द्वारकाबाई तुकाराम बिचुकले (५५) व कलेढोण येथे मच्छिंद्र किसन शिरतोडे (५२) या मेंढपाळाचा मृत्यू झाला. सांगली जिल्ह्णाला मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास वादळी पावसाने झोडपले. वार्‍यामुळे विजेचे खांब, झाडे उन्मळून पडली, अनेकांच्या घरांचे पत्रे उडून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव येथील बिरोबाच्या डोंगरावर वीज कोसळल्याने दहाजण जखमी झाले. त्र्यंबकेश्वर येथे श्री गोरक्षनाथ मठातील मंदिराचे काम चालू असताना मंगळवारी दुपारी वीज कोसळून सेवाराम राजपूत (४०), जगन्नाथ शिंदे (४०) हे जागीच ठार झाले. शिंदे यांची पत्नी अंजनाबाई शिंदे (३५) गंभीर जखमी झाली असून, तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील सावंतवस्तीवर वीज पडून इंदूबाई बंडू सावंत (४५) व सुभद्राबाई सुखदेव सावंत (५२) या चुलत सासू-सुना आणि मंगळवेढाच्या भालेवाडी येथील कमलाबाई म्हाळप्पा पडवळे (५०) हिचा अंगावर सिमेंटची चौकट पडल्याने मृत्यू झाला़ पुणे जिल्ह्णात मंगळवारी मुसळधार पाऊस झाला़ इंदापूर तालुक्यात शेतकरी तुकाराम शिवा कचरे यांचा, तर शिरुर तालुक्यात प्रमिला नरहरी गायकवाड यांचा वीज पडून मृत्यू झाला़ कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील करंजिवणे गावातील वर्षा आनंदा पोवार (१९) हिचा शेतामध्ये भात टोकणताना अंगावर वीज पडून जागीच मृत्यू झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)ू१