शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
2
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
3
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
4
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
5
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
6
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
7
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
8
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
9
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
10
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
11
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
12
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
13
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
14
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
15
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
16
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! 'या' कंपनीशी कुठलाही व्यवहार करू नका; अन्यथा पश्चाताप होईल, सेबीचा इशारा!
18
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
19
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
20
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा

१०८ रुग्णवाहिका बनली माथेरानची जीवन वाहिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2017 02:47 IST

माथेरान पर्यटन स्थळ असून इंग्रजांच्या काळापासून येथे मोटार वाहनांना पूर्णपणे बंदी असून फक्त रुग्णवाहिकेला परवानगी आहे.

माथेरान : माथेरान पर्यटन स्थळ असून इंग्रजांच्या काळापासून येथे मोटार वाहनांना पूर्णपणे बंदी असून फक्त रुग्णवाहिकेला परवानगी आहे. त्यामुळे नगरपालिकेची एक आणि महाराष्ट्र शासनाची १०८ अशा दोन रु ग्णवाहिका माथेरानमध्ये धावत आहेत, त्यापैकी १०८ ही रु ग्णवाहिका माथेरानची जीवन वाहिनी ठरत आहे.डॉ.उदय तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार तीन वर्षांपासून ही रुग्णवाहिका माथेरान व परिसरामध्ये कार्यरत आहे. महिन्याला ३० ते ३५ व वर्षाला ४२५ पेक्षा जास्त रु ग्णांना ही रुग्णवाहिका उपयुक्त ठरते. माथेरानबाहेरील आदिवासी वाड्यांना सुद्धा या रु ग्णवाहिकेचा फायदा मिळतो. या रु ग्णवाहिकेत कार्डियाक सिस्टम असल्याने रु ग्णाला मोठ्या हॉस्पिटलपर्यंत जाण्यास खूप मोठी मदत मिळते तसेच २४ तास चालक व डॉक्टर या रु ग्णवाहिकेत उपलब्ध आहेत,माथेरान हा दुर्गम भाग असल्याने येथे येणाऱ्या पर्यटकास काही दुखापत झाल्यास ही रु ग्णवाहिका तत्काळ उपलब्ध असल्याने या रु ग्णवाहिकेस माथेरानमध्ये महत्त्व प्राप्त झाले आहे. या कारणास्तव ही रु ग्णवाहिका माथेरानसाठी जीवन वाहिनी ठरत आहे.१०८ ही महाराष्ट्र शासनाची रु ग्ण वाहिका आल्यापासून तीन वर्षांच्या कालखंडात १२०० पेक्षा जास्त रु ग्णांना याचा फायदा झाला आहे. गर्भवती महिला, हृदयविकार रु ग्ण, अर्धांग वायू रु ग्ण, श्वसनाचे विकार असलेले रु ग्ण, घोड्यावरून अपघाती पडलेले पर्यटक तसेच माथेरान परिसरातील आदिवासी वाड्या या रु ग्णांना आतापर्यंत या रुग्णवाहिकेचा खूप फायदा झाला आहे. (वार्ताहर)>माथेरान नगरपालिका क वर्गाची असल्याने येथील रु ग्णालयात सर्व सोयी-सुविधा पुरविणे शक्य होत नाही.अशा वेळेस रु ग्णाला त्याच्या इच्छित रु ग्णालयामध्ये पोहोचण्यास या रु ग्णवाहिकेचा उपयोग होत आहे.माथेरानमध्ये घोड्यावरून पडून अपघात झालेल्या पर्यटकांना सुद्धा या रु ग्णवाहिकेचा खूप मोठा आधार आहे. त्यामुळे नक्कीच १०८ ही रु ग्णवाहिका माथेरानकरांसाठी जीवनदायी ठरत आहे.- प्रेरणा प्रसाद सावंत, नगराध्यक्षा >गेली तीन वर्षे या रु ग्णवाहिकेवर डॉक्टर म्हणून मी कार्यरत आहे. या रु ग्णवाहिका आल्यापासून हृदयविकाराने दगावणाऱ्यांची संख्या खूप कमी झाली आहे. माथेरानच्या नगरपालिका रुग्णालयामध्ये काहीच सोयी-सुविधा नसल्याने येथील रु ग्णांना येथून तत्काळ हलविण्यास या रुग्णवाहिकेचा उपयोग होतो. आॅक्सिजनयुक्त सेवा असल्याने येथील दुर्गम भागातून रु ग्णाला घेऊन इतर रुग्णालयात जाणे शक्य होते.- डॉ. सचिन वाणी, माथेरान