शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

खनिकर्मबाधित गावांसाठी १०३ कोटी

By admin | Updated: October 30, 2014 00:45 IST

खनिकर्मबाधित गावांच्या विकासासाठी राज्य शासन आणि खनिकर्म महामंडळाने १०२ कोटी ९९ लाख ३७ हजार रुपयांचा निधी वितरित केल्याचे शपथपत्राद्वारे सांगण्यात आल्याने आज उच्च न्यायालयाचे

हायकोर्ट : आशिष जयस्वाल यांची जनहित याचिका निकालीनागपूर : खनिकर्मबाधित गावांच्या विकासासाठी राज्य शासन आणि खनिकर्म महामंडळाने १०२ कोटी ९९ लाख ३७ हजार रुपयांचा निधी वितरित केल्याचे शपथपत्राद्वारे सांगण्यात आल्याने आज उच्च न्यायालयाचे न्या. भूषण गवई आणि न्या. विनय देशपांडे यांच्या खंडपीठाने याचिकाकर्ते आशिष जयस्वाल यांची जनहित याचिका निकाली काढली. खनिज विकास निर्मिती व उपयोजन निधी नियम २००१ नुसार राज्यात एकूण खनिजातून मिळणाऱ्या स्वामित्व धनातून १० टक्के रकमेच्या दोन तृतीयांश रक्कम खनिज विकास निधी म्हणून जमा करण्यात येतो. यातून खनिकर्मबाधित गावांमध्ये रस्ते, पाणी, आरोग्य सेवा, पर्यावरण संतुलन इत्यादी कामे घेण्यात येतात. वाळू निर्गती धोरणानुसारसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना स्वामित्व धनाच्या दोन तृतीयांश रकमेपैकी ५० टक्के निधी रस्ते, आरोग्य सेवेवर खर्च करण्याकरिता शासनाकडे प्रस्ताव पाठविणे आवश्यक असते. परंतु नागपूर जिल्ह्याकरिता शासनाकडे असे कोणतेही प्रस्ताव पाठविण्यात न आल्यामुळे माजी आ. अ‍ॅड. आशिष जयस्वाल यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. याचिकेत उद्योग व खाण विभागाचे सचिव, महसूल व वन विभागाचे सचिव, महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाचे प्रबंध संचालक आणि नागपूर जिल्हाधिकाऱ्यांना प्रतिवादी करण्यात आले होते. या याचिकेवर जिल्हाधिकारी आणि शासनाच्या वतीने वेळोवेळी शपथपत्र दाखल करण्यात आले होते आणि उच्च न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले होते. याचिका दाखल झाल्यापासून जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे १८३ कामांच्या मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविले होते. या कामांसाठी शासनाने ६० कोटी २५ लाख ७२ हजारांचा निधी वितरित केला आहे. त्याचप्रमाणे खनिकर्म महामंडळानेही ४२ कोटी ७३ लाख ६५ हजाराचा निधी वितरित केलेला आहे. शपथपत्रांनुसार याचिकेचा हेतू पूर्णत्वास आल्याने न्यायालयाने ही याचिका निकाली काढली. न्यायालयात याचिकाकर्त्याच्या वतीने अ‍ॅड. मोहित खजांची आणि राज्य सरकारच्या वतीने मुख्य सरकारी वकील भारती डांगरे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)