शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात १०२ टक्के पावसाचा अंदाज

By admin | Updated: June 2, 2016 00:57 IST

जागतिक स्थरावर हवामानात मोठ्याप्रमाणात बदलत होत असून, भारतात त्याचा मोठा परिणाम होताना दिसत आहे. या वर्षी राज्यात १०२ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

कोल्हापूर : दुष्काळाच्या झळा कोल्हापुरातील ऊसपट्ट्यालाही बसत असून, शेतातील ऊस वाळला आहे, याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाळलेला ऊस घेऊनच शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यानंतर मोर्चाने येऊन आंदोलकांनी निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे यांच्या टेबलावरच हा वाळलेला ऊस ठेवत आर्थिक अरिष्टात सापडलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज शासनाने माफ करावे, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली. दुपारी एकच्या सुमारास शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, जिल्हाध्यक्ष पी. जी. पाटील-वाकरेकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटले. या ठिकाणी कार्यकर्त्यांनी वाळलेला ऊस घेऊनच निदर्शने केली. यानंतर घोषणाबाजी करत सर्व आंदोलक मोर्चाद्वारे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाकडे आले. यावेळी आंदोलकांना वाळलेला ऊस आत घेऊन जाण्याची परवानगी पोलिसांनी नाकारली. परंतु, शेतातील वाळलेला ऊस प्रशासनाला दिसावा यासाठी ऊस आम्ही घेऊन जाणारच, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. त्यामुळे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनीच त्यांना उसासह आत येण्यास सांगितले. आत आल्यानंतर आंदोलकांनी थेट निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलावर वाळलेला ऊस ठेवून चर्चा करायला सुरुवात केली. यानंतर रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. कोल्हापूर जिल्हा हा ऊसपट्टा असल्याने दुष्काळाच्या झळा बसल्या असून, शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडला आहे. संपूर्ण शेती तोट्यात गेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी घेतलेली शेती कर्जे परतफेड करू शकत नाही. म्हणून शासनाने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जे माफ करावीत. त्याचबरोबर दुष्काळामुळे जो ऊस वाळलेला आहे, त्या वाळलेल्या उसाचे पंचनामे करून एकरी ५०,००० रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी. तरच पुढील वर्षी शेती करणे शक्य होणार आहे. आंदोलनात अ‍ॅड. माणिक शिंदे, दिलीप माणगावे, अ‍ॅड. अजित पाटील, आदी सहभागी झाले होते. वाळलेल्या उसासह अन्य पिकांचे पंचनामे करा : नरके जिल्ह्यातील उसासह अन्य पिके वाळली असून त्यांचे तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला कराव्यात; तसेच जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याचा अहवाल शासनाकडे पाठवावा, अशी मागणी बुधवारी आमदार चंद्रदीप नरके यांनी निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून आज, गुरुवारी याबाबत योग्य ती माहिती देऊ, असे आश्वासन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. दरम्यान याविषयी आमदार नरके यांनी महसूल राज्यमंत्री संजय ठाकूर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्यास सांगितले.