शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

उसाच्या फडात १०२ बालकांचा जन्म!

By admin | Updated: February 15, 2015 01:41 IST

उसाच्या फडात पोटासाठी संघर्ष करणाऱ्या १०२ गरोदार महिलांची श्रीगोंद्याच्या कुरुक्षेत्रात गेल्या चार महिन्यांत प्रसूती झाली.

पोटासाठी जीवनसंघर्ष : ओल्या बाळंतिणींचा वनवास कधी संपणार ?बाळासाहेब काकडे - श्रीगोंदाऊसतोड कामगाऱ़़ पाठीवरच संसाराचं बिऱ्हाड... ऊसतोडीच्या कामासाठी दोन महिने एका वाडीवर, तर दोन महिने दुसऱ्या वस्तीवर असं त्यांचं आयुष्य... सोबत लेकरंबाळंही असतात. मात्र यात सर्वाधिक ससेहोलपट होते ती गरोदर ऊसतोड महिलांची. उसाच्या फडात पोटासाठी संघर्ष करणाऱ्या १०२ गरोदार महिलांची श्रीगोंद्याच्या कुरुक्षेत्रात गेल्या चार महिन्यांत प्रसूती झाली. या ओल्या बाळंतिणी आपल्या बाळाला सांभाळतच ऊसतोड करीत आहेत. पुरोगामी महाराष्ट्रात महिला सबलीकरणाचा डांगोरा पिटला जात असताना हजारो ऊसतोड महिला कामगार अजूनही दुर्लक्षितच आहेत. त्यांना ना सकस आहार, ना शासनाची मदत! मुलाबाळांना घेऊन त्या १२-१२ तास राबतात. श्रीगोंद्याच्या कुरुक्षेत्रात श्रीगोंदा, साईकृपा (हिरडगाव), कुकडी, साईकृपा (देवदैठण), वाळकी, दौंड शुगर, अंबालिका आदी कारखान्यांचे सुमारे ५ ते ७ हजार ऊसतोडणी मजूर आहेत. मोडलेल्या संसाराला उभारी मिळावी म्हणून सुमारे ३ हजार महिला आपल्या चिमुकल्यांना बरोबर घेऊन कष्ट उपसत आहेत. या कष्टकऱ्यांची मुलंही हातात लेखणीऐवजी कोयताच घेतलेली दिसतात. प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल होणाऱ्या गर्भवती महिलांच्या प्रसूतीबाबत विशेष काळजी घेतली असून, प्रसूती झालेल्या सर्व महिलांना जननी शिशु सुरक्षा योजनेतून प्रत्येकी ७०० रुपयांची मदत दिली जाणार आहे.- डॉ. शैला डांगे, तालुका वैद्यकीय अधिकारी, श्रीगोंदा.