शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

दहा हजार कोटींचे ‘दुष्काळ’ पॅकेज

By admin | Updated: December 17, 2015 03:25 IST

विरोधकांनी केलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या मागणीला बगल देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील १४ दुष्काळग्रस्त जिल्ह्यांसाठी १० हजार ५१२ कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा

नागपूर : विरोधकांनी केलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या मागणीला बगल देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील १४ दुष्काळग्रस्त जिल्ह्यांसाठी १० हजार ५१२ कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा बुधवारी विधानसभेत केली. त्यात कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ७,४१२ कोटींची थेट मदत देण्यात येणार आहे. हिवाळी अधिवेशनात प्रारंभापासून विरोधकांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून अनेकदा कामकाज बंद पाडले, तर काँग्रेसने मोठा मोर्चाही काढला. मात्र, कर्जमाफीने शेतकऱ्यांचा नव्हे तर बँकांचा फायदा होतो, याचा पुनरुच्चार करत आत्महत्या रोखण्यास हा एकमेव उपाय नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. एका तालुक्यापुरता परवाना असलेला सावकार जिल्ह्यातील अन्य तालुक्यांत कर्ज देऊ शकत नाही पण अनेक सावकारांनी अशी कर्जे दिलेली आहेत. ती माफ करण्यात येतील. त्याचा फायदा ७९ हजार शेतकऱ्यांना होईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. जलयुक्त शिवार योजनेमुळे शेतीला २४ टीएमसी पाणी मिळाले. ते मोजण्याच्या शास्रीय पद्धतीवरून हे प्रमाण काढले आहे. आपल्या सरकारने गेल्यावर्षी शेतकऱ्यांना १० हजार कोटींहून अधिकची मदत केली. आघाडी सरकारला पाच वर्षांतही हे करता आले नव्हते, असा दावाही त्यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)विरोधकांचा सभात्यागमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले पॅकेज हे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. कर्जमाफी देण्याची क्षमता नसेल तर राज्य सरकारने केंद्राकडे जायला हवे, पण राज्य सरकारला कर्जमाफी द्यायचीच नाही. सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. त्यानंतर सरकारचा निषेध करत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सभात्याग केला. जलयुक्त शिवार समितीचे अध्यक्षपद आमदारांनाजलयुक्त शिवार योजनेचे तालुकास्तरीय अध्यक्षपद स्थानिक आमदारांना दिले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. योजनेसाठी आमदार निधीतून आमदार जेवढा निधी देतील तेवढाच निधी शासनाकडून दिला जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी या घोषणेचे स्वागत केले.महाराष्ट्रासह ११ राज्यांना नोटीसनवी दिल्ली : दुष्काळाशी निपटणे आणि दुष्काळ पीडित शेतकऱ्यांना पुरविण्यात आलेल्या मदतीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार तसेच महाराष्ट्रासह ११ राज्यांना नोटीस बजावत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ‘स्वराज अभियान’ या स्वयंसेवी संस्थेने सर्वोच्च न्यायालयात गत १४ डिसेंबरला याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने ही नोटीस जारी केली. येत्या ४ जानेवारीला या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.4200 कोटींची केली केंद्राकडे मागणीराज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारकडे ४२०० कोटी रुपयांची मदत मागण्याचा प्रस्ताव ७ नोव्हेंबरलाच पाठविण्यात आला आहे. मदतीसाठी आणखी एक पुरवणी प्रस्ताव पाठविला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.