शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

१० वर्षांत इमारती मोडकळीस

By admin | Updated: June 30, 2015 03:10 IST

राज्य राखील पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) इमारती १० वर्षांतच मोडकळीस आल्यामुळे त्यांच्या बांधकामाची अंतर्गत दक्षता चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

डिप्पी वांकाणी,  मुंबई राज्य राखील पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) इमारती १० वर्षांतच मोडकळीस आल्यामुळे त्यांच्या बांधकामाची अंतर्गत दक्षता चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. एसआरपीएफ कर्मचाऱ्यांसाठी २००३ मध्ये गोरेगावात १३ इमारती बांधण्यात आल्या. या प्रत्येकी पाच मजली इमारतींमुळे ४४८ कुुटुंबांची निवासाची व्यवस्था झाली होती. मात्र अवघ्या १० वर्षांतच मोडकळीस येऊन या इमारती मानवी वास्तव्यास अपात्र बनल्या. परिणामी, एसआरपीएफ कर्मचाऱ्यांनी २०१३ मध्ये त्यांना रामराम ठोकून आपले बस्तान अन्यत्र हलविले, असे एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले. या इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिटसाठी (इमारतीच्या प्रकृतीचा आढावा घेण्यासाठी करण्यात आलेला प्राथमिक तांत्रिक सर्व्हे) शशांक मेहेंदळे नावाच्या व्यक्तीने १९ लाख रुपयांचे बिल उचलले होते. याबाबत अधिक माहिती घेतली असता महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण मंडळाच्या अर्थसंकल्पात अशा प्रकारच्या कामासाठी कोणतीही तरतूद नसल्याची बाब मला आढळून आली. विशेष म्हणजे मोडकळीस आल्यामुळे एसआरपीएफ कर्मचारी या इमारती सोडण्याच्या तयारीत असताना त्यांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर मी तातडीने या प्रकरणी अंतर्गत दक्षता चौकशीचे आदेश दिले. चौकशीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका मुख्य अभियंत्यास आमच्याकडे प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले आहे, असे हा अधिकारी म्हणाला. इमारतीचे सरासरी आयुष्य ४० वर्षांचे असताना एसआरपीएफ कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या १३ इमारती १० वर्षांतच कशा काय मोडकळीस आल्या, याचा चौकशीत आढावा घेण्यात येणार असून यात प्रकल्पाचे व्यवस्थान पाहणारे, वास्तुविशारद किंवा तांत्रिक विभाग यापैकी कोणाचा दोष आहे हे निश्चित केले जाणार आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले. इमारतींच्या स्लॅबला मोठमोठे तडे गेले असून, काही ठिकाणचे स्लॅब कोसळू लागले आहेत. इमारतींची अवस्था दिवसेंदिवस अधिकच दयनीय होत चालल्यामुळे आम्ही कर्मचाऱ्यांना या इमारती सोडून अन्यत्र स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. दरम्यान, या इमारती बांधणारा तोलानी नावाचा ठेकेदार बांधकाम व्यवसायातून बाहेर पडला असून, तो आता प्लास्टिक उद्योगात असल्याचे समजते.