शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीच्या आमिषाने १० लाखांची फसवणूक

By admin | Updated: June 30, 2016 01:17 IST

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळात कनिष्ठ लिपिकपदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून चौघांची १० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला

पुणे : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळात कनिष्ठ लिपिकपदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून चौघांची १० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ उमेश जयवंत कडलक आणि दक्षता उमेश कडलक (दोघे रा़ सेवक वसाहत, सावित्रीबाई फुले विद्यापीठ) अशी त्यांची नावे आहेत़ हा प्रकार १५ ते २७ जूनदरम्यान घडला़ याप्रकरणी प्रशांत मडके (वय ३१, रा़ सिंहगड रोड) यांनी फिर्याद दिली आहे़ उमेश कडलक नोकरी लावून देतो, अशी माहिती मडके यांना मिळाली होती़ कडलक याने वखार महामंडळात कनिष्ठ लिपिक म्हणून नोकरी लावतो, असे आश्वासन देऊन त्यासाठी २ लाख रुपये लागतील, असे सांगितले़ मडके यांनी स्वत:साठी, बहीण, मेहुणा आणि आणखी एकाला नोकरी लावावी, असे सांगितले़ त्यानुसार प्रत्येकी दोन लाख रुपयांप्रमाणे १० लाख रुपयांपैकी काही पैसे रोख, तर काही धनादेशाद्वारे त्यांना दिले़ तरीही नोकरी न लावता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले़ तेव्हा फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले़ उमेश कडलक याचे नातेवाईक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नोकरीला असून तो त्यांच्याकडे राहत आहे़ चतु:श्रृंगी पोलिसांनी त्या दोघांचा शोध घेतला, पण ते फरार झाले आहेत़ (प्रतिनिधी)>४४ हजारांना लुबाडलेजेट एअरवेजमध्ये केबिन क्रू म्हणून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ४४ हजार १०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी खडक पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ मौला शेख (वय २२, रा़ भवानी पेठ) यांनी फिर्याद दिली आहे़ हा प्रकार १८ ते २२ जूनदरम्यान घडला़ राहुल शर्मा असे नाव सांगणाऱ्याने सोशल वेबसाईटवर नोकरीसाठी आॅनलाइन जाहिरात दिली होती़ शेख यांनी त्यावर संपर्क केला असताना त्यांना जेट एअरवेजमध्ये केबीन क्रू म्हणून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून कागदपत्रे मागवून घेतली़ त्यानंतर अन्य तिघांनी त्यांना वेळोवेळी संपर्क करून वेगवेगळ्या कारणाकरिता बँकेच्या खात्यात पैसे भरण्यास लावले़ त्यानंतरही नोकरी न दिल्याने शेख यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले़