शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

परमार यांच्या मृत्यूप्रकरणातील आरोपीकडून आव्हाडांच्या खात्यात १ कोटी जमा

By admin | Updated: December 1, 2015 09:10 IST

ठाण्याचे प्रसिद्ध बिल्डर सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी आरोपी असलेले नगरसेवक नजीब मुल्ला खान यांच्या बँक खात्यातून १ कोटी ७ लाख रुपये राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र

मुंबई : ठाण्याचे प्रसिद्ध बिल्डर सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी आरोपी असलेले नगरसेवक नजीब मुल्ला खान यांच्या बँक खात्यातून १ कोटी ७ लाख रुपये राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत, अशी खळबळजनक माहिती सोमवारी राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिली. याप्रकरणी आव्हाड दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असेही राज्य सरकारने उच्च न्यायालयाला सांगितले.सूरज परमार यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल आणि लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसचे नजीब मुल्ला व हनुमंत जगदाळे तर काँग्रेसचे विक्रांत चव्हाण आणि अपक्ष सुधाकर चव्हाण यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत. अटकेच्या भीतीने या चौघांनीही उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. या याचिकांवरील सुनावणी न्या. अजय गडकरी यांच्यासमोर होती.बचावपक्षांच्या वकिलांनी सोमवारी त्यांचा युक्तिवाद संपवला, तर सरकारच्यावतीने विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी युक्तिवादास सुरुवात केली. ही गोल्डन गँग असून अन्य विकासकांकडून खंडणी वसूल करणे, हेच या चौघांचे काम असल्याचे न्या. गडकरी यांना अ‍ॅड. ठाकरे यांनी सांगितले. आपण लोकप्रतिनिधी म्हणून मृत व्यक्तीच्या (परमार) बेकायदेशीर कृत्यांबाबत महापालिकेमध्ये आवाज उठवला, असा या चौघांनीही दावा केला आहे. ठाण्यात फार मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर बांधकामे असतानाही मृत व्यक्तीच्याच बांधकामांविरुद्ध सातत्याने आवज का उठवण्यात आला? या चौघांनीही ज्याप्रकारे त्यांच्या मागे हात धुवून लागली होती, त्यावरून त्यांचा हेतू सिद्ध होतो. तपासयंत्रणेने काही महत्वाच्या कॉल्सचे अ‍ॅनालिसीस केले आहे, त्यावरून हे चौघेही या घटनेशी संबंधित असल्याचे सिद्ध झाले आहे, असे अ‍ॅड. ठाकरे म्हणाले.परमार यांच्या सुसाईड नोटमध्ये या चारही नगरसेवकांच्या नावाचा उल्लेख केला होता. त्याचबरोबर ठाण्यातील बडे राजकीय पुढारीही त्रास देत असल्याचा आरोप त्यांनी नोटद्वारे केला होता. मात्र आपल्या पश्चात कुटुंबियांना त्रास होऊ नये, यासाठी चारही नगरसेवकांची नावे खोडली तर राजकीय नेत्यांच्या नावांचा उल्लेख करणे टाळले.नगरसेवक नजीब मुल्ला यांच्या बँक खात्यातून १ कोटी ७ लाख रुपये आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. एवढी मोठी रक्कम का आणि कशासाठी ट्रान्सफर करण्यात आली? याचीही चौकशी करायची आहे. ही रक्कम याच केससंदर्भात असेल तर सरकार संबंधित आमदारावरही कारवाई करेल, असेही अ‍ॅड. ठाकरे यांनी सांगितले.तसेच विक्रांत चव्हाण, हनुमंत जगदाळे आणि सुधाकर चव्हाण यांच्याही आर्थिक व्यवहाराची चौकशी करायची असल्याने या सर्वांना पोलिसांच्या ताब्यात देणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. या याचिकांवर आता मंगळवारी सुनावणी होणार आहे. (प्रतिनिधी)संबंधित आमदारावर कारवाई होणारतपासादरम्यान नगरसेवक नजीब मुल्ला यांच्या बँक खात्यातून १ कोटी ७ लाख रुपये आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. एवढी मोठी रक्कम का आणि कशासाठी ट्रान्सफर करण्यात आली? याचीही चौकशी करायची आहे. ही रक्कम याच केससंदर्भात असेल, तर सरकार संबंधित आमदारावरही कारवाई करेल, असेही अ‍ॅड. ठाकरे यांनी न्या. गडकरी यांना सांगितले.परमार यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये या चारही नगरसेवकांच्या नावाचा उल्लेख केला होता. त्याचबरोबर ठाण्यातील बडे राजकीय पुढारीही त्रास देत असल्याचा आरोप त्यांनी नोटद्वारे केला होता. मात्र आपल्या पश्चात कुटुंबीयांना त्रास होऊ नये, यासाठी चारही नगरसेवकांची नावे खोडली तर राजकीय नेत्यांच्या नावांचा उल्लेख करणे टाळले.