शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

येरोळ परिसरातील सोयाबीनवर हळद्या रोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:26 IST

येरोळ : येरोळ व परिसरातील सोयाबीनवर सध्या हळद या रोगाचा प्रादुर्भाव दिसत असून, या रोगामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होत ...

येरोळ : येरोळ व परिसरातील सोयाबीनवर सध्या हळद या रोगाचा प्रादुर्भाव दिसत असून, या रोगामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. येरोळ व परिसरात ३० टक्के सोयाबीनमध्ये घट येणार हे निश्चित असल्याचे शेतकरी सांगत आहेत. सध्या अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शासन आणि विमा कंपनीने संयुक्तपणे पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी येरोळ परिसरातून शेतकरी करीत आहेत.

बसेस सुरू करण्याची नागरिकांची मागणी

लातूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शहरी भागातील बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. त्याच धर्तीवर ग्रामीण भागात बसेस सुरू करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. मुक्कामी बसेस बंद असल्याने विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यातच डिझेलचे दर वाढल्याने एसटी महामंडळाला अडचणींचा सामना करावा लागत असून, उत्पन्नही घटले आहे. दरम्यान, प्रवाशांच्या प्रतिसादानुसार बसेस सुरू केल्या जात असल्याचे लातूर महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी बसेस सुरू करण्याची मागणी होत आहे.

पिकांचे पंचनामे करून मदत द्या

लातूर : जिल्ह्यात मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचल्याने पिके पिवळी पडत असून, उत्पादनात घट होणार आहे. दरम्यान, खरिपाच्या मध्यंतरी पावसाने उघडीप दिली होती. आता समाधानकारक पाऊस झाला असला तरी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमधून होत आहे.

जिल्ह्यातील प्रकल्पांत मुबलक पाणीसाठा

लातूर : जिल्ह्यात समाधानकारक पावसामुळे लघु, मध्यम साठवण तलावात मुबलक प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. रेणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून, रबी हंगामातील पिकांना या पाण्यामुळे मदत होणार आहे. मसलगा, व्हटी, तिरू, देवर्जन, रेणा आदी प्रकल्पांत मुबलक प्रमाणात पाणीसाठा झाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील काही प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ५५० मिमीहून अधिक पाऊस झाला असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.