शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

यंदा श्रावण २९ दिवसांचाच, मंदिरात प्रवेश मिळणार का ।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:15 IST

लातूर : श्रावण महिन्यात भक्तांची मांदियाळी जिल्ह्यातील विविध गावात असलेल्या शिव मंदिरांत दिसून येते. श्रावण साेमवारी दर्शनासाठी मध्यरात्रीपासूनच माेठ्या ...

लातूर : श्रावण महिन्यात भक्तांची मांदियाळी जिल्ह्यातील विविध गावात असलेल्या शिव मंदिरांत दिसून येते. श्रावण साेमवारी दर्शनासाठी मध्यरात्रीपासूनच माेठ्या प्रमाणावर रांगा लागतात. गतवर्षी काेराेनाच्या प्रादुर्भावामुळे मंदिरांची दारे बंद झाली. मार्च २०२०पासून भाविक-भक्तांना दर्शनाची आस लागली आहे. मात्र, मंदिरांची दारे उघडणार की नाही, याबाबत अद्यापही काही सांगता येत नाही. उत्तर भारतात हिंदी समाजबांधवांची श्रावणपूजा २५ जुलैपासून प्रारंभ हाेत आहे. तर महाराष्ट्रातील मराठी बांधवांचा श्रावणमास ९ ऑगस्टपासून सुरु हाेणार आहे. भाविक-भक्तांना शिवालयात प्रवेश मिळावा, अशी अपेक्षा सर्वांनाच आहे. मात्र, शासनाने अद्याप ठाेस निर्णय जाहीर केलेला नाही. शिवालयात हाेणारी भाविकांची गर्दी यामुळे येथे बेल-फूल विक्रेते, पूजा साहित्य विक्रेत्यांना माेठा आधार मिळताे. मात्र, गत दाेन वर्षांपासून हक्काचा राेजगार हिरावला गेला आहे. मंदिर परिसरात हाेणारी सर्वच उलाढाल ठप्प झाली आहे. यंदा श्रावण महिन्यात भाविक-भक्तांना दर्शन घेता येईल, अशी आशा विक्रेते, व्यावसायिक आणि भाविकांना लागून आहे.

९ ऑगस्टपासून श्रावण

उत्तर भारतातील हिंदी समाजबांधवांचा श्रावण मास हा २५ जुलैपासून सुरु हाेत आहे तर महाराष्ट्रातील मराठी समाजबांधवांचा श्रावण मास ९ ऑगस्टपासून सुरु हाेत आहे. यंदा श्रावण महिन्यात पाच साेमवार आले आहेत. दि. ६ सप्टेंबरला शेवटचा श्रावण साेमवार येत आहे. दाेन वर्षांपासून काेराेना प्रादुर्भावामुळे भाविक-भक्तांना श्रावण महिन्यात मंदिरात प्रवेशावर बंदी आहे. यंदा प्रवेश मिळेल का, ही आस लागून आहे.

मंदिर परिसरातील व्यावसायिक म्हणतात...

आमचा उदरनिर्वाह पूजा साहित्य, नारळ विक्रीतून होताे. हा आमचा पारंपरिक व्यवसाय आहे. काेराेनाच्या प्रादुर्भावामुळे मंदिरांची दारे बंद आहेत. त्यामुळे मंदिरातील भाविकांची वर्दळ ओसरली आहे. यातून आमच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. सध्याला घरप्रपंच भागवणे कठीण झाले आहे. आता श्रावण महिन्यात मंदिरांची दारे उघडतील, अशी अपेक्षा आहे. मात्र, अद्यापही शासनाकडून कुठलाही निर्णय झाला नसल्याने संभ्रम आहे.

- पांडुरंग फुलारी, दुकानदार

बेल-फूल, पूजा साहित्याची श्रावण मासात माेठ्या प्रमाणावर विक्री हाेते. यातून आमचा उदरनिर्वाह चालताे. मात्र, दाेन वर्षांपासून मंदिरांची दारेच बंद असल्याने या व्यवसायातील उलाढाल ठप्प झाली आहे. आम्ही परंपरेनुसार मंदिर परिसरात बेल विक्रीचा व्यवसाय करताे. आता श्रावण महिन्यात मंदिरांची दारे उघडली तर हा व्यवसाय पुन्हा उभारी घेईल, अशी आशा आहे.

- शरण स्वामी, बेल-फूल विक्रेता