यावेळी सिंदगीकर म्हणाले, कवितेचा शोध घेणे ही एक अवघड पण आनंददायी यात्रा आहे. ज्या रानात कवितेचे उत्तम पीक येतं त्या रानाची सलगी करून नव्या कोंबाच्या हाती जग बदलण्याची शक्ती देणे हे तसं अत्यंत जिकिरीचं काम आहे. आजची पिढी शिक्षण घेऊन उच्च पदावर जात आहे. आपणही डॉक्टर, इंजिनिअर, वैज्ञानिक बनाल, पण शिक्षणातून माणूस आणि माणुसकी निर्माण झाली पाहिजे. आजचे शिक्षण गुणांचे असून, गुणवत्तेचे नाही. तुम्ही मोठे झाल्यानंतर आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात न टाकता घरी सांभाळ करणारे शिक्षण दिले पाहिजे. यावेळी प्रा. नारनवरे, प्रा. कसाब यांनीही मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपात दंतराव यांनी साहित्य परिषदेची वाटचाल विषद केली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. रामराव वाघमारे, मोहनराव शिंदे, अंगद कांबळे, तानाजी जगताप, राजेंद्र सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष भरत सूर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन नरसिंगे अण्णासाहेब यांनी, तर आभार राजेंद्र सूर्यवंशी यांनी मांनले.
कॅप्शन : ‘बीसेफ’प्रणित अण्णा भाऊ साठे साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात ‘जग बदल घालुनी घाव’ कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी साहित्यिक विलास सिंदगीकर, प्रा. डॉ. अशोक नारनवरे, प्रा. डॉ. मारोती कसाब, रंजना चव्हाण.