शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

चाकूरच्या नरेश सावळेने बनविले जागतिक नोबॉल डिटेक्टर तंत्रज्ञान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:15 IST

चाकूर : येथील अभियंता नरेश सावळे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील जागतिक दर्जाचे नोबॉल स्पष्टता व अचूकतेचे तंत्रज्ञान बनविले आहे. तो ...

चाकूर : येथील अभियंता नरेश सावळे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील जागतिक दर्जाचे नोबॉल स्पष्टता व अचूकतेचे तंत्रज्ञान बनविले आहे. तो नांदेडच्या श्री गुरुगोविंदसिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालयात असून, त्याचे पेटंट भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाद्वारे प्रकाशित करण्यात आले आहे.

क्रिकेटच्या सामन्यात एका चुकीच्या अथवा संशयित निर्णयामुळे टीमचे नुकसान होते. त्यामुळे नरेश रमेश सावळे याने नोबॉल डिटेक्टरची संकल्पना करून तंत्रज्ञान विकसित केले आहे. कारण नजरचुकीने पंचांचा निर्णय चुकीचा ठरू शकतो. ही तक्रार थर्ड अंपायरकडे गेली तरी त्याला कोटींच्या किंमतीत असणाऱ्या चार बाजूच्या कॅमेऱ्यांत पाहून निर्णय घ्यावा लागतो. क्रिझ फिकट असल्यास निर्णय चुकू शकतो.

७ ऑगस्ट २०१९ मध्ये त्याने प्रोजेक्टची सुरुवात करून १३ नोव्हेंबर २०१९ मध्ये पूर्ण केला. या प्रोजेक्टमध्ये नोबॉल डिटेक्ट करण्यासाठी थर्ड अंपायरची गरज नाही. नोबॉल डिटेक्टर आपोआप स्क्रीनवर नोबॉल दर्शवितो. त्यात दोन पद्धती आहेत. एक म्हणजे मधल्या स्टँपमध्ये बसविलेल्या कॅमेऱ्याची आणि दुसरी म्हणजे एम्बेडेड सिस्टमची.

पहिल्या पद्धतीत स्टॅम्प कॅमेरा क्रिझची फुटेज रेकॉर्ड करतो आणि वायरलेस कॅमेरा संगणकप्रणालीशी जोडलेला असल्याने व्हिडिओवर प्रोसेसिंग सुरू होते. गोलंदाजीच्या काही क्षणात नोबॉलचा निकाल आपोआप टीव्ही स्क्रीनवर दिसेल. गोलंदाजाच्या बुटाचे छायाचित्र दाखविले जाईल, तसेच धावबाद अथवा यष्टीबादसारख्या परिस्थितीत बसविलेला कॅमेरा स्टॅम्प खाली पडण्याची शक्यता असते. तेव्हा प्रोग्राम्ड क्रिझ लोकेशन विस्कळीत होऊ नये म्हणून सावळे यांनी नॉच पद्धती विकसित केली आहे. ज्यामध्ये स्टॅम्पवरील नॉच व त्यालगतच्या जमिनीवरील नॉच जुळवून स्टॅम्प बसविण्यात येतो.

विशेष म्हणजे, ७ ते ८ हजारांच्या परवडणाऱ्या दरात हे विकसित केले आहे. सर्व स्तरावरील क्रिकेट सामन्यांत फ्रंटफूट नोबॉलशी निगडित निर्णय अगदी अचूकपणाने या संशोधनामुळे देता येतील.

शाळेपासूनच नरेशने मिळविली पारितोषिके...

नरेशने इयत्ता आठवीत असताना तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात एलडीआर सेन्सरचा वापर करून ऊर्जा वाचविण्याचा प्रयोग सादर केला होता. डीपी फ्यूज स्टेटस युजिंग जीएसएम सिस्टीमचा वापर करून कुठला फ्यूज गेला ते सांगणाऱ्या तंत्रज्ञानाचा प्रयोग जिल्हास्तरावर सादर केला होता. त्याचे राज्यस्तरावर कौतुक झाले होते. इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात असताना डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स प्रोजेक्ट डिजिटल टेस्टर या प्रयोगाला राज्यातून तिसरा व आंतरमहाविद्यालयातूनही तिसरा क्रमांक मिळाला होता. इकॉनॉमिकल इलेक्ट्रॉनिक मल्टिस्टेटर या प्रोजेक्टला राज्यातून पहिला क्रमांक मिळाला. त्याचे इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण झाले असून, आता एमटेकसाठी सुरतमध्ये शिक्षण घेणार आहे.