बियाणे हाताळताना काळजी घ्यावी
बियाणे हाताळताना आदळआपट होणार नाही, याची दक्षता घ्यावी. टोकण पद्धतीने किंवा प्लँटरचा वापर करून पेरणी करावी, सोयाबीनची उगवण क्षमता ७० टक्क्यांपेक्षा कमी असल्यास अधिकचे बियाणे वापरावे तसेच १०० मि.मी. पर्यंत पाऊस झाल्यावरच पेरणी करावी. सोयाबीनची साठवणूक करताना बियाणे सावलीत वाळवावे. त्यानंतरच पेरणी करावी, असेही कृषी विभागाने सांगितले आहे.
चांगल्या प्रतीच्या बियाणांची निवड करावी
ग्राम बीजोत्पादन, पीक प्रात्यक्षिक योजनेअंतर्गत शेतकरी समुहाकडून आलेल्या उत्पन्नातून बियाणांची निवड करता येते. प्रमाणित बियाणांपासून आलेल्या उत्पादनातून चाळणी करून चांगल्या प्रतीच्या सोयाबीनची निवड करावी. सोयाबीनचे बियाणे अत्यंत नाजूक असून, त्याचे बाह्य आवरण पातळ असते. त्यामुळे त्याची उगवण क्षमता अबाधित राखण्यासाठी हाताळताना काळजी घ्यावी. तसेच साठवणूक करताना आर्द्रतेचे प्रमाण १० ते १२ टक्क्यांपेक्षा जास्त नसावे. साठवणुकीसाठी प्लास्टीक पोत्यांचा वापर करू नये. थप्पी सात फुटांपेक्षा जास्त उंचीवर असणार नाही, याची काळजी घ्यावी असे आवाहनही गावसाने यांनी केले आहे.