शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
3
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
4
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
5
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
6
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
7
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
8
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
9
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
10
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
11
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
12
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
13
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
14
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
15
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
16
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
17
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
18
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
19
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
20
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
Daily Top 2Weekly Top 5

निलंगा तालुक्यात कार-दुचाकी अपघातात दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:26 IST

पोलिसांनी सांगितले, अनसरवाडा येथील सरपंच पद्मिनबाई सुग्रीव उसनाळे यांचे चिरंजीव बालाजी उसनाळे (४० वर्षे) हे निलंगा येथील अडत ...

पोलिसांनी सांगितले, अनसरवाडा येथील सरपंच पद्मिनबाई सुग्रीव उसनाळे यांचे चिरंजीव बालाजी उसनाळे (४० वर्षे) हे निलंगा येथील अडत व्यापारी असून, सायंकाळी ते गावाकडे निघाले होते. अनसरवाडा पाटीजवळ त्यांच्या शेताच्या दरम्यान ते आले असता, निलंग्याकडून येत असलेल्या भरधाव कारचा ताबा सुटला व बालाजी यांच्या मोटारसायकलवर येऊन आदळली. यात कारला अडकून दुचाकीसह ते जवळपास ५० ते ६० फूट फरपटत गेले, यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच कारमधील तिघे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील बालाजी ताकनाटे (५०, रा. कलमुगळी) यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. तर, गहिनीनाथ व्यंकट गोबाडे व महादेव तात्याराव वाघमारे (रा. कलमुगळी) यांना पुढील उपचारासाठी लातूरला हलविण्यात आले आहे. याप्रकरणी नितीन उसनाळे यांनी निलंगा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून कारचालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

अडत व्यापारी निघाले होते गावी...

अनसरवाडा येथील रहिवासी असलेले बालाजी सुग्रीव उसनाळे हे सायंकाळी निलंगा येथून गावाकडे निघाले होते. पाठीमागून आलेल्या कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. निलंगा उपजिल्हा रुग्णालय येथे त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. गुरुवारी सकाळी १०.३० वाजता त्यांच्या पार्थिवावर अनसरवाडा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.