शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवामुळे ट्रॅव्हल्सची भाडेवाढ; मुंबईसाठी द्यावे लागतात अधिकचे पैसे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:26 IST

अहमदपूर : गणेशोत्सवामुळे इतर शहरांकडे जाण्याला नागरिकांची पसंती असते. अनेक नागरिक पर्यटनासाठी व आपल्या गावी जाण्यासाठी बाहेर पडतात. याचाच ...

अहमदपूर : गणेशोत्सवामुळे इतर शहरांकडे जाण्याला नागरिकांची पसंती असते. अनेक नागरिक पर्यटनासाठी व आपल्या गावी जाण्यासाठी बाहेर पडतात. याचाच फायदा सध्या खासगी ट्रॅव्हल्सवाले घेताना दिसत आहेत. सुटीच्या पार्श्वभूमीवर खासगी ट्रॅव्हल्सच्या भाड्यात वाढ झाली असून, एसटी व खासगी ट्रॅव्हल्सच्या भाड्याची तुलना करता दोघांमध्ये फारशी तफावत दिसून येत नाही. त्यामुळे लोक खासगी ट्रॅव्हल्सलाच प्राधान्य देत आहेत.

गणेशोत्सवानिमित्त गावी जाण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू आहे. ऐन सणासुदीत अचानक भाडेवाढ करण्याचा निर्णय खासगी बस वाहतूकदारांनी घेतला आहे. परिणामी प्रवास करताना प्रवाशांच्या खिशाला कात्री लागत आहे. मोठ्या प्रमाणात नागरिक खासगी बसमधून प्रवास करताना दिसून येत आहे.

प्रवाशांना फटका...

गणेशोत्सव, महालक्ष्मी या सणासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात आपल्या गावाकडे येतात. खासगी वाहनधारकांनी मोठ्या प्रमाणात तिकिटामध्ये भाडेवाढ केल्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. - राजेश चिलकरवार

अहमदपूर तालुक्यातील बरीच कुटुंबे उदरनिर्वाहासाठी मुंबई, पुणे शहरांत कामास आहेत. त्यांना सणासुदीच्या काळात मुंबई, पुण्याकडून गावाकडे परत येताना व जाताना अचानकपणे तिकिटामध्ये वाढ केली जात असल्यामुळे आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. - कृष्णा मुंडे

अहमदपूर - मुंबई आधीचे दर ७०० आताचे दर ९००

अहमदपूर- नागपूर आधीचे दर ७०० आताचे दर १०००

अहमदपूर - पूणे आधीचे दर ७०० आताचे दर ९००

अहमदपूर- औरंगाबाद आधीचे दर ६०० आताचे दर ८००

दोन वर्षांनंतर बरे दिवस...

कोरोनामुळे बसेस काही दिवस बंदच होत्या. त्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. सतत डिझेलचे भाव वाढत असल्याने नाइलाजास्त तिकिटांचे दर वाढवावे लागले आहेत. सणासुदीत ट्रॅव्हल्सला नागरिकांची पसंती असते. इतर वेळेत बसेस रिकाम्याच धावतात. परिणामी, खर्च वाढल्याने दरवाढ करण्यात आली आहे. - रमेश देशमुख, ट्रॅव्हल्स मालक

गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे ट्रॅव्हल्स व्यवसाय संकटात आला आहे. आता परिस्थिती पूर्वपदावर येत असली तरी डिझेलचे भाव सतत वाढत आहेत. सणासुदीत प्रवाशांची गर्दी असते. नुकसान भरून काढण्यासाठी पर्याय नसल्याने दरवाढ केली जात आहे. वाढत्या महागाईमुळे खर्च भागविणे अवघड झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. - ट्रॅव्हल्स मालक