शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: सुनेत्रा पवार यांना जर भाजप मुख्यमंत्री करणार असेल तर... - संजय राऊत
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
8
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
9
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
10
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
11
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
12
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
13
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
14
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
15
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
16
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
17
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
18
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
19
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
20
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
Daily Top 2Weekly Top 5

तिरू प्रकल्प शंभर टक्के भरला, सिंचनाचा प्रश्न संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:25 IST

हाळी हंडरगुळी : सततच्या जोरदार पावसामुळे उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी परिसरातील तिरू मध्यम प्रकल्प पूर्णपणे भरला आहे. त्यामुळे हाळी ...

हाळी हंडरगुळी : सततच्या जोरदार पावसामुळे उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी परिसरातील तिरू मध्यम प्रकल्प पूर्णपणे भरला आहे. त्यामुळे हाळी हंडरगुळीसह परिसरातील गावांच्या पाणीप्रश्नाबरोबर सिंचनाचाही प्रश्न संपुष्टात आला आहे. प्रकल्प पूर्णपणे भरल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांच्या आशा उंचावल्या आहेत.

यंदाच्या पावसाळ्याच्या प्रारंभी झालेल्या पावसामुळे खरिपाच्या वेळेवर पेरण्या झाल्या होत्या. त्यानंतर पिकांपुरता पाऊस झाला होता. त्यामुळे पिकेही बहरली होती. मात्र, पिण्याच्या पाण्याची भीती व्यक्त होत हाेती. त्यातच जवळपास तीन आठवड्यांपेक्षा अधिक काळ पावसाने ताण दिला. परिणामी, बहरलेली पिके कोमेजून जात होती. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे, ते शेतकरी पीक जगविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते. दरम्यान, वातावरणात बदल होऊन पाऊस सुरू झाला आणि पिकांना जीवदान मिळाले. मात्र, प्रकल्प भरण्यासाठी मोठ्या पावसाची गरज होती.

गत आठवड्यापासून सतत संततधार पाऊस झाला. याशिवाय, मागील दोन-तीन दिवसांत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या. गेल्या आठवड्यापर्यंत तिरू मध्यम प्रकल्पात ४२ टक्के पाणीसाठा होता. सप्टेंबर महिना सुरू झाला असतानाही प्रकल्प भरला नसल्याने आगामी काळात पाणीटंचाईची भीती जाणवत होती. मात्र, दोन दिवसांत झालेल्या पावसाने तिरू प्रकल्प पूर्णपणे भरला.

तिरू नदीचे पात्र हे उदगीर, चाकूर व जळकोट या तीन तालुक्यात विस्तारले आहे. या नदीवरच हाळी गावाजवळ असलेल्या चिमाचीवाडी येथे १९७६ साली तिरू मध्यम प्रकल्प पूर्णत्वास आला. या प्रकल्पाची साठवण क्षमता २३.३२ दलघमी एवढी आहे. २०११ साली तत्कालीन आ. चंद्रशेखर भोसले यांच्या पुढाकाराने प्रकल्पाची उंची एका मीटरने वाढविल्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे.

प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्र २६९.६७ चौ.किमी एवढे आहे. त्यामुळे २६५४.६० हेक्टर जमिनीला त्याचा लाभ होतो. प्रकल्पाअंतर्गत २६२५.०२ हेक्टर जमीन वहिताखाली येते. त्याचा फायदा हाळी हंडरगुळीसह चिमाचीवाडी, मोरतळवाडी, आडोळवाडी, सुकणी, वाढवणा बु., वाढवणा खु., लांबी, बेळसांगवी आदी गावांतील शेतकऱ्यांना होतो. शिवाय, पिण्याच्या पाण्यासाठी हा प्रकल्प आधार आहे. या प्रकल्पावरून ५२ खेडी पाणीयोजना कार्यान्वित आहे.

चार दरवाजे उघडले होते...

मंगळवारी सायंकाळी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने रात्री चार दरवाजे उघडले होते. पण पाऊस थांबल्याने बुधवारी एकच दरवाजा उघडला गेला, असे अभियंता नईम मोमीन यांनी सांगितले.

दोन वर्षांनंतर तिरू मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरल्याने पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे, असे चिमाचीवाडीचे सरपंच नाथराव बंडे यांनी सांगितले.