शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कबड्डीच्या प्रसारासाठी वेळेचा त्याग करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:15 IST

साठेनगर येथे सामाजिक उपक्रमाचे आयोजन लातूर : शहरातील साठेनगर येथील बुद्धविहारामध्ये अन्नधान्य आणि संसार उपयोगी साहित्याचे वितरण तसेच कोरोना ...

साठेनगर येथे सामाजिक उपक्रमाचे आयोजन

लातूर : शहरातील साठेनगर येथील बुद्धविहारामध्ये अन्नधान्य आणि संसार उपयोगी साहित्याचे वितरण तसेच कोरोना प्रतिबंधात्मक जाणीवजागृती करण्यात आली. यावेळी मनपा आयुक्त अमन मित्तल, प्रा.डॉ. श्रीकांत गायकवाड, प्रा.डॉ.सुधीर मस्के, रुपेश गायकवाड, बाळासाहेब कांबळे, डॉ.महेश गंगावणे, नितीन कांबळे, अनसूया मस्के, शिवाजी चिंचकर, मीराताई मस्के, सुनील मांदळे, रवी शिरसाठ, विजयकुमार गायकवाड, अतुल कांबळे, गोविंद झाकडे, लखन कांबळे, दीपक शिरसाठ, सुरेश वाघमारे, शिवाजी कांबळे, धोंडूबाई साकळे, पद्मीनबाई शिरसाठ, लक्ष्मीबाई कांबळे, पारूबाई सोरते आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन सुनील मांदले यांनी तर आभार विजयकुमार गायकवाड यांनी मानले.

हरंगुळ खु. जि.प. शाळेची पाहणी

लातूर : जिल्हा परिषद प्रशाला हरंगूळ खुर्द येथे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यू.व्ही. साळुंके, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शाम गोडभरले यांनी भेट देऊन शाळेची पाहणी केली. बाला उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात असून, हरंगुळ खु. येथील शाळेने उपक्रमाची तयारी केली आहे. याबाबत सुरु असलेल्या कामाची उपमुख्य कार्यकारी अधिकारी साळुंके आणि गटविकास अधिकारी शाम गोडभरले यांनी पाहणी केली तसेच राबवित असलेल्या कामाची माहिती घेतली. यावेळी जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

आस्था कौशल्य केंद्रात प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण

लातूर : आस्था कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत डोमेस्टिक डेटा एन्ट्री ऑपरेटर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ६० प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी केंद्राचे संचालक किरण भावठाणकर यांची उपस्थिती होती. यावेळी किरण भावठाणकर, केंद्रप्रमुख अण्णासाहेब साठे, राहुल गायकवाड, अजय कांबळे, प्रशिक्षक प्रा. सुचेता साठे, सुयोग जोगदंड, सुकेश सोनकांबळे आदींची उपस्थिती होती.

खरीप पीपक विमा भरण्यास २३ जुलैपर्यंत मुदतवाढ

लातूर : शासनाने खरीप हंगाम २०२१ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत २३ जुलै पर्यंत वाढविली आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग नोंदवलेला नाही अशा शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्र सीएससी बँक शाखेमध्ये विमा हप्ता भरुन आपले पीक विमा संरक्षित करावे. अधिक माहितीसाठी कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.

दयानंद कला महाविद्यालयात कार्यशाळा

लातूर : येथील दयानंद कला महाविद्यालयात फॅशन डिझाईन विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी इकोफ्रेंडली आर्टिकल्स या विषयावर ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. घरामध्ये व परिसरामध्ये असणाऱ्या टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू कशा बनविल्या पाहिजेत या बाबतचे कौशल्य आणि साहित्य इत्यादींची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. कार्यशाळेत प्रा. हर्षा जैन यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी प्रा. पी.के . देशमुख, प्रा. डी. एस. निलावार, प्रा. पी. व्ही. बिराजदार,, प्रा. आर. जे. नाईक, प्रा. एस. टी. हालदार आणि प्रा. के. एस. बजाज आदींची उपस्थिती होती.